फणसोप सडा येथे घरफोडीचा प्रयत्न 

 

रत्नागिरी | प्रतिनिधी :तालुक्यातील फणसोप सडा येथील घराच्या मागील व पुढील दरवाजाचा कोयंडा तोडून अज्ञाताने चोरी करण्याचा प्रयत्न केला. ही घटना 4 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6 ते 5 ऑगस्ट रोजी दुपारी 3.30 वा. कालावधीत घडली आहे.

सुश्रृत शैलेश भाटकर (36) यांनी याबाबत शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, ते 4 ऑगस्ट ते 5 ऑगस्ट दरम्यान बाहेर गावी गेले असताना अज्ञाताने फणसोपसडा येथील त्यांच्या घराच्या मागील व पुढील दरवाजाचा कोयंडा तोडून चोरी करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात भारतीय न्यायसंहिता अधिनियम 2023 चे कलम 305,331 (3), 331 (4),62 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.