कुटुंबियांचे भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांच्याकडून सांत्वन व मदत
वेंगुर्ले : दाजी नाईक
वेंगुर्ले तालुक्यातील वेतोरे वरचीवाडी येथील सर्वेश सुरेश गावडे हा नोकरी साठी मुंबईत जाऊन कुटुंबाला हातभार लावत होता. मात्र कामावर असताना वीजेच्या धक्क्याने त्याचा मृत्यू झाला. हि दुर्घटना मुंबईत घडली. या घटनेमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. दरम्यान या बाबत भाजप युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांना समजताच त्यांनी गावडे कुटुंबीयांना मदत दिली.
दीड वर्षांपूर्वी अचानक वडिलांचा मृत्यू झाल्याने घरची जबाबदारी आणखीनच वाढलेली. घरची परिस्थिती सुधारण्यासाठी सर्वेश गावडे कामासाठी मुंबईत गेला. तो काकांकडे रहात आयटीआय करून ठाण्यात एका खाजगी कंपनीत ॲप्रेन्टीसशिप करून नोकरीत कायम होणार अशी स्थिती होती. त्याच दरम्यान विजेचा धक्का बसून सर्वेशने जगाचा कायमचा निरोप घेतला. आशेचा किरण दिसत असताना अचानकच हा दुर्दैवाचा धक्का गावडे कुटूंबाला बसला. ही परिस्थिती श्री विशाल परब यांना समजताच त्यांनी गावडे कुटुंबीयांना धीर देत आपल्याकडून मदत म्हणून काही आर्थिक तरतूद गावडे परिवारासाठी करून दिली. भाजपा पदाधिकारी सरपंच प्राची नाईक, माजी पंचायत समिती सदस्या सौ स्मिता दामले, साक्षी राऊळ, प्रवीण गावडे, विजय वालावलकर, तेजस जाधव, विक्रांत सावंत, प्रमोद मेस्त्री, गोटू राऊळ, जितेंद्र राऊळ, प्रशांत नाईक, सुजाता वालावलकर आदी भाजपा पदाधिकाऱ्यांनी गावडे कुटुंबीयांची भेट घेत विशाल परब यांनी केलेली आर्थिक मदत आज त्यांच्याकडे सुपूर्द केली.












