खेड(प्रतिनिधी) मुंबई गोवा महामार्गा वरील कशेडी बोगद्यात दोन कार मध्ये अपघात झाल्याची घटना ४ ऑगस्ट रोजी घडली होती या प्रकरणी एका कार चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे
समीर सिध्दार्थ मोहीते असे गुन्हा दाखल झालेल्या कार चालकाचे नाव आहे तर या प्रकरणी श्री अब्दुल अजीज अब्दुल रहिमान साठी वय ५२ वर्षे यांनी तक्रार दाखल केली आहे
फिर्यादी त्यांचे ताब्यातील मारुती वॅगनर कार क्र. एम.एच. ०८ ए.एक्स. १८७६ ही स्वता चालवित रायगड ते खेड येत असताना कशेडी बोगद्यामध्ये एकाच बोगद्यातून दुहेरी वाहतुक चालु असल्याने बोगदयाचे सिमेंट ब्लॉक ठेवुन मुंबई ते गोवा तसेच गोवा ते मुंबई जाणा-या अशा दोन लेन केलेल्या आहेत तेव्हा यातील फिर्यादी हे त्यांचे डावे बाजुचे कशेडी बोगद्याचे एका लेन मधुन जात असताना अचानक समोरून यातील आरोपीत याने दारू पिलेल्या अवस्थेत त्याचे ताब्यातील हुंदाई औरा कार क्र क्र.एम.एच. ०२ एफ. एक्स. ६२०८ ही राँग साईटने भरधाव वेगात हयगयीने चालवुन फिर्यादी यांचे चाहनाला समोरून धडक दिली. त्यात दोन्ही वाहनांचे तसेच फिर्यादी यांचे वाहनातील फिर्यादी यांचे नातेवाईक यांना दुखापत होवुन दोन्ही वाहनांचे नुकसान झाले या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.












