खेड(प्रतिनिधी) लोटे रोट्रॅक्ट क्लबने राबवलेल्या वैविध्यपूर्ण व समाजहितकारक उपक्रमांची दखल घेत कोल्हापूर येथे झालेल्या जिल्हास्तरीय वार्षिक कार्यक्रमात लोटे रोट्रॅक्ट क्लब ४ पुरस्कारांचा मानकरी ठरला.
२०२३-२४ मधील कामगिरीसाठी बेस्ट क्लब इन हेल्थ, बेस्ट डीआरआर व्हिजिटचा पुरस्कार प्राप्त झाला. वैयक्तिक पातळीवर क्लबचे सेक्रेटरी शुभम काते यांना रत्नागिरी विभागातून बेस्ट सेक्रेटरीचा किताब मिळाला. रत्नागिरी झोनमध्येही यंदा बेस्ट झोनल प्रोजेक्टचा पुरस्कारही प्राप्त झाला. लोटे रोट्रॅक्ट क्लबचे अध्यक्ष अनिकेत काते, सेक्रेटरी शुभम काते यांनी पुरस्कार स्वीकारला.











