खेड (प्रतिनिधी) राष्ट्रीयकृत बँक असलेल्या बँक ऑफ इंडिया, रत्नागिरी झोनल कार्यालयामधील अधिकारी वर्गाने
कर्तव्यात कसूर करुन लोकसेवक पदाचा दुरुपयोग करुन अनुसुचित जातीच्या तसेच हृदयविकार त्रास असलेल्या गजेंद्र विठ्ठलदास खेडेकर यांना आपल्यावर अन्याय केल्याप्रकरणी तसेच कित्येक वर्षापासून आपली झालेल्या आर्थिक फसवणूकीची रक्कम व नुकसान भरपाई मिळत नसल्याकारणाने आत्मदहन करणार असल्याचा इशारा निवेदना द्वारे देण्यात आला आहे
झोनल अधिकाऱ्यांनी व रजनिस कर्नाटक मॅनेजिंग डायरेक्टर तथा सीईओ, बांद्रा, मुंबई येथील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या विरोधात बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स, मुंबई
येथील वरिष्ठ पोलीस निरिक्षक यांना निवेदन दिले आहे. गजेंद्र खेडेकर यांनी बँक प्रशासन यांना दिलेल्या पत्रात म्हटल्याप्रमाणे सदर बँकेच्या झोनल कार्यालय रत्नागिरीच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांनी खोडसाळ कागदपत्रे तयार करुन स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी संगनमत करुन खेडमधील सदनिकेचा ताबा नसतानाही ताबा आहे असे भासवून १२ लाख ७३ हजार एकशे दहा रुपयाची आर्थिक फसवणूक केली त्यासंदर्भात बँकेचे ५ अधिकारी यांच्यावर खेड पोलीस ठाण्यात ०९.१२.२०२३ रोजी गुन्हा देखील दाखल झाला, मात्र झालेली आर्थिक फसवणूकीची रक्कम व झालेली नुकसान भरपाई प्राधिकृत अधिकारी मार्फत केलेल्या खरेदी खताच्या अटी व शर्तीचे उल्लंघन करुन झालेली आर्थिक झळ व नुकसान भरपाई अद्यापही देत नसल्याने तसेच बँकेच्या झोनल कार्यालयातील कर्मचारी स्वप्निल अगरवाल यांनी कर्तव्यात कसूर करुन अर्वाच भाषेत शिविगाळ केली असल्याचे म्हटले आहे
पुरावे देऊन सुध्दा सदर कर्मचाऱ्यावर व बँक अधिकाऱ्यांवर आजपर्यंत निलंबनाची कारवाही करत नसल्याने त्यांनी बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना तथा मॅनेजिंग डायरेक्टर रजनिश कर्नाटक व अमिताभ बॅनर्जी – मॅनेजर, ग्राहक गुणवत्ता शाखा, बँकींग विभाग, मुंबई व आर. के. होथा जनरल मॅनेजर, पश्चिम विभाग, पुणे या बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटण्याचे अनेक वेळा प्रयत्न देखील करण्यात आले
बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटण्याचे अनेक वेळा प्रयत्न करुन देखील ते भेटत नाही व सन २०१६ पासून पत्रव्यवाहर करुनही उत्तरही देत नाही व वेळही देत नाहीत. व दादही देत नसल्याने मागासवर्गीय असलेल्या गजेंद्र खेडेकर यांच्या मानवी जिवनाच्या हक्काचे पायमल्ली करुन त्यांना हृदयग्रस्त पिडीत करुन, शारिरीक त्रास होऊन मानसिक त्रास दिलेला असून आर्थिक फसवणूकीमुळे मानसिक संतुलन देखील ढासळत चालले आहे.
त्याबाबत गजेंद्र खेडेकर यांनी रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर, मुंबई व वित्त मंत्री निर्मला सितारामन यांना सुध्दा केलेल्या फसवणूकीबाबत तक्रार दाखल करुन सुध्दा गजेंद्र खेडेकर यांच्या तक्रारीची दखल घेतली नाही. त्यामुळे आर्थिक फसवणुकीमुळे मला आत्महत्या प्रवृत्त करणाऱ्या या कार्यालयातील संबंधीत अधिकारी यांच्यावर कारवाही व्हावी तसेच आपल्या जिवाचे काही बरे वाईट झाल्यास बँक ऑफ इंडिया कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी जबाबदार असतील असे गजेंद्र खेडेकर यांनी बांद्रा- कुर्ला कॉम्प्लेक्स, मुंबई येथील वरिष्ठ पोलीस निरिक्षकांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.










