सांगेली । प्रतिनिधी : फळझाडांना रोगामुळे होणाऱ्या जखमांना लावण्यासाठी बोर्डोपेस्ट चा उपयोग होतो. झाडाच्या बुंध्याला बोर्डो पेस्ट लावल्यामुळे बुरशीचा वनस्पतीच्या जखमांवर हल्ला होत नाही. शेतकऱ्यांना बोर्डो पेस्ट कशी तयार करायची, तसेच त्याचा वापर कसा व किती प्रमाणात करायची याची संपूर्ण माहिती सावरवाडी येथील कृषी दुकाने शेतकऱ्यांना दिले. त्याचबरोबर कृषी दुतानी बोर्डोपेस्ट कसे लावावे याचे प्रात्यक्षिक दाखवले.
हे प्रात्यक्षिक छत्रपती शिवाजी कृषी महाविद्यालय किर्लोस ओरोस चे प्राचार्य योगेश पेडणेकर, कार्यक्रम
अधिकारी प्रसाद ओगले, प्रा. गोपाल गायकी, व इतर प्राध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी अथर्व मठकर, लक्षदिप शेटकर, श्रीनिवास वाळके, ऋत्विक तेली, अनिरुद्ध.पी, अरुणदेव.सी. पी यांनी उत्साहात पार पाडले.










