मंडणगड :प्रतिनिधी : येथील मंडणगड तालुका विकास मंडळ ,(F14 28 )मुंबई, संचलित डॉ. बाबासाहेब आंबेडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय मंडणगड, मधील विद्यार्थ्यांनी, न्यू इंग्लिश स्कूल पालवणी येथे आयोजित करण्यात आलेल्या, तालुकास्तरीय शालेय बुद्धिबळ स्पर्धांमध्ये सुयश प्राप्त केले आहे.
14 वर्षे वयोगटातून,१) कुमार वेदांत सुर्वे तृतीय क्रमांक २) जितेंद्र मोरे चतुर्थ क्रमांक प्राप्त केला आहे. तसेच चौदा वर्ष मुली या गटातून१)कुमारी इंसा फरास हिने द्वितीय क्रमांक प्राप्त केला आहे. सतरा वर्ष वयोगटातून १)कुमार कैवल्य जोशी यांनी प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. त्याचबरोबर२) सुमेध सकपाळ चौथा तर ३)सिफान कोंडेकर यांने पाचवा क्रमांक मिळवला आहे.
सतरा वर्ष मुली या गटामध्ये १)कुमारी मुग्धा धुमाळे हिने प्रथम क्रमांक मिळवला असून ,२) मिसबाह कुरये ही चौथी आलेली आहे.
19 वर्ष मुले या गटात १) कुमार हेमंत जाधव यांन चौथा क्रमांक प्राप्त केला असून २) ऋतिक खरशेकर याने पाचवा क्रमांक प्राप्त केला आहे.
हे सर्व विद्यार्थी जिल्हास्तरावर मंडणगड तालुक्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत.
त्यांच्या या उत्तुंग यशाबद्दल संस्थेचे उपाध्यक्ष श्री. रमेशजी दळवी, संस्थेचे चिटणीस श्री. संतोष मांढरे संस्थेचे सदस्य श्री. राकेश शिंदे तसेच प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. विजय खाडे ,उपमुख्याध्यापक श्री. अर्जुन हुल्लोळी , पर्यवेक्षक श्री. शांताराम बैकर यांनी गुलाब पुष्प देऊन यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे क्रीडाशिक्षक श्री. मनोज चव्हाण व श्री. संजय अवेरे यांचेही अभिनंदन केले.
या कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक, शिक्षिका , विद्यार्थी व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
तालुक्यातून या विद्यार्थ्यांवर अभिनंदन यांचा वर्षाव होत आहे.










