कोकण रेल्वे दुहेरीकरणासाठी लवकरच*संबंधीत राज्याचे मुख्यमंत्री व अधीकारी यांच्यासमवेत लवकरच संयुक्त बैठक

 

 

– केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनि वैष्णव यांनी मुंबई उत्तर पश्चिम लोकसभाचे खासदार रविंद्र वायकर यांना दिली आश्वासन 

– मेट्रो 3 व 6 लाईन एअरपोर्ट व जोगेश्वरी (पूर्व) रेल्वे स्टेशनला जोडण्याची केली मागणी 

दोडामार्ग l प्रतिनिधी :कोकण रेल्वेच्या मार्गावरून कोकणात जाणारे चाकरमानी यांचा प्रवास लवकरच जलद होणार आहे. इतके वर्ष कोकण रेल्वेचा मार्ग दुहेरी होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या प्रवाशांचे स्वप्न लवकरच सत्यात उतरणार आहे. कोकण रेल्वेचा मार्ग दुहेरीकरण करावा, या मागणीचे निवेदन घेऊन मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा क्षेत्राचे खासदार रविंद्र वायकर यांनी गुरुवारी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची लोकसभेत भेट घेतली. यावेळी त्यांनी लवकरच संबंधीत राज्याचे मुख्यमंत्री यांची संयुक्त बैठक घेण्याचे आश्वासन दिले.

 

सध्या कोकण रेल्वेच्या मार्गावर एकच ट्रॅक आहे. गणेशोत्सव, होळी, उन्हाळ्याची सुट्टी या व अन्य दिवशी मिळून कोकण रेल्वेच्या मार्गावर दरवर्षी सुमारे ३ कोटी पेक्षा जास्त प्रवासी प्रवास करतात. असे असतानाही या मार्गावर एकच ट्रॅक असल्याने प्रवाशांची फारच गैरसोय होते. बरेचवेळा प्रवासी नियोजित वेळेत आपल्या घरी पोहचत नाहीत. कोकण रेल्वेचे दुपदरीकरण करण्याचा प्रस्ताव मागील एक वर्षापासून रेल्वे बोर्डाकडे प्रलंबित आहे. या प्रस्तावाचा विचार करून कोकण रेल्वेच्या दुपदरीकरणाचा प्रस्तावाला मंजुरी देण्यात यावी, असे निवेदन खासदार रविंद्र वायकर यांनी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांना दिले.

हा प्रश्न सोडवण्यासाठी लवकरच संबंधीत राज्याचे मुख्यमंत्री व अधीकारी यांच्या समवेत संयुक्त बैठेक घेण्यात येईल, असे आश्वासन रेल्वे मंत्री यांनी खासदार वायकर यांना दिले. त्याच बरोबर वायकर यांनी मेट्रो 3 ही एअरपोर्टशी तसेच मेट्रो 6 जोगेश्वरी रेल्वे स्टेशनशी जोडण्यात यावी अशी विनंती केली. यावर निश्चित निर्णय घेण्यात येईल,असे आश्वासन ही रेल्वे मंत्री यांनी दिले.