आजचा दिवस कसा जाईल? 9 ऑगस्ट 2024, शुक्रवार.

मेष रास
आज जे मिळते आहे ते सोडून तिसरेच काहीतरी मिळावे म्हणून तुमची अपेक्षा असेल. हातात असलेले काम सोडून तुम्ही करमणुकीसाठी वेळ शोधा. स्वतःच्या सुखासाठी इतर नातेसंबंध, आवडत्या गोष्टी, भावना, असे सगळे क्षणात विसरून जाऊ शकता.

वृषभ रास
आज तुम्ही मागच्या चुकातून काहीच शिकला नाहीत हे सिद्ध होईल. झालेल्या त्रासातून कसे बाहेर पडता यावर पुढचे आयुष्य अवलंबून आहे. जे लाइफ मधून गेले, हरवले, त्याचे दुःख करताना त्यातून झालेल्या त्रासापासून काय शिकलात हे विसरून जाणार आहात. भूतकाळातून बाहेर पडता येणार नाही. इतरांनी सांगितले तरी काही गोष्टी पटणार नाहीत. पुन्हा तेच दुःख उगाळणार आहात.

मिथुन रास
आज तुम्हाला अडचणींमधून मार्ग मिळेल. जुन्या प्रॉब्लेम वर नवीन सोल्युशन सापडेल. कामानिमित्त प्रवास होतील. कुटुंबासाठी तसेच खास व्यक्तींसाठी वेळ काढावा लागेल. मनातली निराशा कमी होईल.

Hemant Kulkarni, [8/4/2024 5:36 PM]
कर्क रास
आज मन मुक्तपणे फिरण्याचा आनंद घेईल. फक्त रिलॅक्स व्हावे, काही करू नये असे वाटेल. मजा तेवढीच करा, जेवढी खिशाला आणि शरीराला परवडेल. टेस्टी आणि तिखट पदार्थ खाण्याची इच्छा होईल. अवैध नाते संबंधांपासून लांब राहण्याची गरज आहे. मनात मध्येच भीतीची छाया दाटून येईल.

सिंह रास
आज दिवस आनंदात जाईल. ऊर्जा आणि उत्साह भरपूर असेल परंतु ह्याच उत्साहाच्या भरात इतरांना काहीतरी फटकन बोलू शकता. कामात यश मिळेल. रागावर नियंत्रण ठेवा. जे काम जमत नाही त्यात मदत घ्या. तुमच्या आदर्श व्यक्तीशी भेट होण्याचे योग आहेत.

कन्या रास
आज तुम्हाला आनंद उपभोगता येणार नाही. तुमच्या नशिबात आनंद नाहीच असे वाटायला लागेल. परंतु जीवन जगताना तुम्हीच छोट्या छोट्या गोष्टीतून आनंद मिळवला नाहीत हे लक्षात घ्या. खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवा. पोटाचे विकार त्रास देतील. मीटिंग तसेच इतर काही कामे कॅन्सल होण्याची शक्यता आहे.

तुळ रास
आज तुम्हाला संतुलन साधण्यात अडचणी येतील. जगणे आऊट ऑफ बॅलन्स होईल. एक तर अचानक खूप बदल करू शकता किंवा मग स्वतःचेच खरे म्हणून काही करणार नाही. असे सगळ्याच बाबतीत झाल्यामुळे एकही धड काम होऊ शकणार नाही. एकट्याने काम करावे लागेल. चुका होतील. निर्णय बरोबर येणार नाहीत.

वृश्चिक रास
आज घर आणि कुटुंबाचे सुख मिळेल. लग्नाचा विचार करण्यास हरकत नाही. तसे स्थळ सांगून येईल. एखाद्या कामाचे नवीन प्रोजेक्टची सुरुवात होऊ शकते. घरासंबंधी काही नवीन आणि शुभ गोष्टी घडतील.

धनु रास
आज तुम्हाला सावध राहिले पाहिजे. प्रत्येक काम करताना खऱ्या खोट्याची टेस्ट करून मगच पुढे जायचे की नाही ते ठरवा. एखाद्या विश्वासू व्यक्ती अथवा संस्थेकडून तुमची फसवणूक केली जाऊ शकते. दिलेला शब्द कोणी पाळणार नाही. एखादे काम हातून जाईल किंवा सोडावे लागेल.

मकर रास
आज अतिरिक्त काम करण्यास स्पष्ट शब्दात नकार द्या. जबाबदारीच्या ओझ्याखाली दाबले जाऊ शकता. सगळीकडे धावपळ करावी लागेल. अति कामामुळे दुसरीकडे लक्ष देता येणार नाही. शारीरिक आजार वाढू शकतात. हेल्थ कडे लक्ष देणे गरजेचे आहे.

कुंभ रास
आज इतरांसमोर तुमची बाजू मांडावी लागेल. आज खऱ्याच्या बाजूने उभे रहा. जे सत्य आहे ते तुम्ही सर्वांसमोर सांगू शकता. फक्त तुम्ही किती चांगल्या शब्दात ते मांडता यावर तुमचे यश अवलंबून आहे. अडचणीतून मार्ग निघतील. कामे पूर्ण होतील. बुद्धीच्या जोरावर यश मिळेल.

मीन रास
आज तुम्हाला जे वाटते त्यावर ठाम रहा. इतरांचा विरोध सहन करावा लागेल. पायांची काळजी घ्या. तुम्हाला पूर्वाभास होतील. त्यावर विश्वास ठेवून काम केल्यास यश मिळेल.

@Ritikaslifetherapies
रितिका –
ज्योतिष सल्लागार, अध्यात्मिक मार्गदर्शक
पुणे.
कॉन्टॅक्ट: 9049680353
+++++++++++++++++++++++++++++++