सहवेदना : मिरजोळे लक्ष्मीकांतवाडी येथील रुक्मिणी जोशी यांचे निधन

 

रत्नागिरी । प्रतिनिधी :शहरानजिक मिरजोळे लक्ष्मीकांतवाडी येथील रहिवासी असलेल्या रुक्मिणी तुकाराम जोशी यांचे गुरूवारी रात्री आकस्मिक निधन झाले. मृत्यूसमयी त्या 99 वर्षांया होत्या.

 

 

सुस्वभावी व्यक्तीमत्व म्हणूनरुक्मिणी या गावात सर्वपरिचित होत्या. गावातील, वाडीतील सर्वांशी त्यांचा सलोखा होता. गुरूवार 9 ऑगस्ट रोजी रात्री अचानक त्यांची प्रकृती खालावली आणि त्यांची प्राणज्योत मालवली. शुक्रवारी सकाळी त्यांच्या पार्थिवावर मिरजोळे येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार पार पडले. त्यावेळी कुटुंबिय, नातेवाईक आणि गावातील बहुसंख्य मंडळीं उपस्थिती होती. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, पुतणे, सुना, नातवंडे, पुतवंडे असा मोठा परिवार आहे.