चंदीगडहून रत्नागिरीत आलेल्या 18 वर्षाच्या मुलीने सांगितली आपबिती
लव्ह जिहाद प्रकरण; रत्नागिरी पोलिसाचा फेक नावावर गुन्हा दाखल
रत्नागिरी । प्रतिनिधी
हिंदू मुलाच्या नावाने सोशल मीडियावर फेक अकाऊंट काढून रत्नागिरीतील १३ वर्षीय मुलाने चंदीगड पंजाब येथील १८ वर्षीय मुलीला फूस लावून रत्नागिरीत लग्नासाठी बोलावून घेतले. या संपूर्ण प्रवासात तिला पैसे पुरवण्यात आले, रत्नागिरी रेल्वे स्थानकावर तिला नेण्यासाठी कारचीही व्यवस्था करण्यात आली होती. मात्र त्या तरुणीचे दैव बलवत्तर म्हणून ही युवती फसवणूक होण्यापासून वाचली. ज्या हिंदू नावाने फेक आइडी वरून तो मुलगा मुलीच्या संपर्कात होता तो मुस्लिम समाजाचा असल्याचे आणि या मुलाच्याही मागे अन्य कोणी सूत्रे हलवत त्या मुलीला जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करत असल्याचे उघड झाले आहे. चंदीगडच्या या मुलीला रत्नागिरीतील हिंदू बांधवानी एकत्र येऊन मदत केली. मात्र रत्नागिरी पोलिसांनी याचा सखोल तपास करण्याऐवजी फेक नावावरच गुन्हा दाखल करुन त्या १३ वर्षीय मुलाला चौकशी न करता सोडून दिल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. हे हिंदू मुलींना फसवण्याचे मोठे रॅकेट असल्याचा संशय असताना पोलिसांनी मात्र तपास मर्यादित केल्याचे म्हटले जात आहे. पोलिसांच्या या संभ्रमात टाकणाऱ्या भूमिकेमुळे संताप व्यक्त केला जात आहे.
या घडलेल्या संपूर्ण प्रकारची माहिती चंदीगडमधील त्या मुलीने शनिवारी प्रसार माध्यमांसमोर सांगितली. ती म्हणाली की गेले वर्षभर इंस्टाग्राम वर हर्ष कुमार यादव नावाच्या युवकाशी तिची मैत्री झाली होती. या मैत्रीतूनच ते एकमेकांच्या प्रेमात पडले. त्यानंतर गेले दोन महिन्यांपासून या युवकांने तिला लग्नाची मागणी घालत तिला रत्नागिरीत बोलावून घेतलं. सुरुवातीला दोन महिन्यांनी लग्न करूया असं सांगणाऱ्या या युवकाने कालांतराने तत्काळ तू चंदीगड येथून मोहाली, लखनऊ आणि लखनऊ येथून रत्नागिरीत ये असं तिला सांगितलं. यासाठी लागणाऱ्या पैशांची व्यवस्था सुद्धा या हर्ष कुमार यादव नावाच्या मुलाकडून तिला होत होती. चंदीगडहून लखनऊला आल्यानंतर या मुलीला तिचा सिमकार्ड फेकून देण्यास सांगण्यात आलं. त्यानंतर तेथीलच एका व्यक्तीकडून तिला पैसे पाठवण्यात आले. त्या पैशाच्या आधारे ती रत्नागिरी रेल्वे स्थानकावर आली. रत्नागिरी रेल्वे स्थानकावर आल्यावर आपण तात्काळ लग्न करणार आहोत, तुला न्यायला आपल्या दोघांचं नाव असलेली एक कार येईल असंही तिला सांगितलं गेलं. तिच्या सुदैवाने तिची ट्रेन लवकर रत्नागिरी स्थानकामध्ये दाखल झाली. रत्नागिरीत आल्यानंतर तिथे तिला नेण्यासाठी आलेली कोणतीही गाडी दिसली नाही म्हणून तिने सातत्याने हर्ष कुमार यादव नावाच्या मुलाशी संपर्क करण्यास सुरुवात केली. त्यावेळेला तो फोन एका मुलीने उचलला आणि त्याचं नाव हर्ष कुमार नसून रुझान असल्याचे आणि तो तेरा वर्षीय मुलगा असल्याचंही सांगितलं.
आपण फसवलं गेलो आहोत हे लक्षात आल्यानंतर चंदिगडच्या या युवतीने घरी परत चंदीगडला जाण्यासाठी पैसे नसल्याने रत्नागिरी स्थानकाबाहेर जाऊन कुठे काम मिळतं का याची शोधा शोध केली. याच वेळेला नजीकच्या एका मोबाईल दुकानात ती गेल्यानंतर तिथे त्या व्यवसायिकांने तिची चौकशी केली असता ती कुठल्या प्रसंगामध्ये अडकली आहे हे त्यांच्या लक्षात आलं. या सगळ्या प्रकरणात सकल हिंदू समाजातील कार्यकर्त्यांशी याबाबतची माहिती देण्यात आली. त्यानंतर या युवतीला घेऊन पोलीस स्थानकामध्ये नेण्यात आलं.
त्यानंतर पोलिसांनी हर्षकुमार यादव नावाने संपर्कात असलेल्या मुलाला पोलिसांनी बोलावून घेतले असता त्याने धक्कादायक माहिती दिली. आपण या मुलीशी मुंबईतील मित्रासाठी संपर्कात होतो असे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी त्या मुलाला सोडून दिले. मुलगी म्हणाली की इन्स्टाग्रामवर जो फोटो होता तो मुलगा पोलीस स्टेशनला आला नव्हता. मात्र जो फोन यायचा तो आवाज सारखाच होता. मी सातत्याने सांगूनही मला त्या मुलाने वीडियो कॉल केला नाही पण फोनवर बोलणे आणि इनस्टावर मेसेज केले गेले. त्यावेळी फोन मी करायचो आणि मेसेज मुंबईतील मित्र करायचा असे त्या मुलग्याने सांगितले. पोलीस तपासात त्या मुलाचे नाव रुझान असल्याचे निष्पन्न झाले. मात्र या चौकशीनंतर पोलिसांनी मुंबईतील त्या मित्रापर्यंत जाण्यास कोणतेच प्रयत्न केले नाही असे सकल हिंदू समाजाचे म्हणणे आहे. या संपूर्ण प्रकरणात सकल हिंदू समाजाच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या भूमिकेबाबत आश्चर्य व्यक्त केले आहे. एक 13 वर्षाचा मुलगा मुलीला लग्नासाठी चंदिगड येथून बोलवतो, प्रवासात तिच्या पैशाची व्यवस्था करतो, रत्नागिरीत आल्यावर गाडीची व्यवस्था करतो हे न पटण्यासारखे असून यात मोठे रॅकेट असावे, मात्र त्या अल्पवयीन मुलाकडून मुंबईतील मित्रांपर्यंत आणि या रॅकेट पर्यंत पोहोचणे आवश्यक होते. मात्र पोलिसांनी जे फेक नाव होते त्यावर गुन्हा दाखल केला आहे. असेही ते म्हणाले. आज चंदीगडच्या मुलीचे दैव बलवत्तर म्हणून ती वाचली, पण तिला न्यायला आलेल्या कार मधे ती बसली असती तर तिला कुठे नेले गेले असते याचा पत्ताच लागला नसता. आज हे एक प्रकरण पुढे आले आहे पण अशाच फेक आइडी बनवून यात हिंदू मुलीना फसवले गेले असण्याची शक्यता आहे. मात्र अत्यंत गंभीर घटना असूनही पोलिसांनी मात्र ज्याचा कधीच तपास होणार नाही त्या फेक नावावर दाखल केलेला गुन्हा ही संतापाची बाब असल्याचे सकल हिंदू समाजाचे म्हणणे आहे. तर अन्य धर्मातील लहान मुलांचा वापर करुन असे रॅकेट रत्नागिरीत चालवले जात असून त्याचा गांभीर्याने तपास होणे आवश्यक आहे अशी मागणीही करण्यात आली आहे.
दरम्यान या मुलीच्या वडिलांशी सकल हिंदू समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी सम्पर्क केल्यानंतर तिचे वडील रत्नागिरीत दाखल झाले. आपण खूप मोठी चूक केल्याचे त्या मुलीने प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. यात रत्नागिरीतील हिंदू समाज एकत्र आला आणि त्या मुलीला मदत करण्यात आली











