कलांगण च्या सांगितिक कार्यक्रमानी रसिक भारावले.

Kalangan’s musical program enthralled the audience.

ज्ञानप्रबोधिनीच्या चिपळूण केंद्रावरील विद्यार्थ्यांनी घेतला सहभाग

माखजन |वार्ताहर : संगमेश्वर तालुक्यातील सांस्कृतिक चळवळ जपणाऱ्या कलांगण परिवार आणि माखजन पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाच्या सहयोगाने झालेल्या ‘शुभ्र सुगंधित मने ‘ या सांगितिक कार्यक्रमाला उपस्थित रसिकांची उत्स्फूर्त दाद मिळाली.या संपूर्ण कार्यक्रमात ज्ञानप्रबोधिनी निगडी पुणे च्या चिपळूण संपर्क केंद्रावरील विद्यार्थी,तसेच माखजन इंग्लिश् स्कूल मधील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी लोकप्रिय कवितांचे सांगितिक सादरीकरण केले.तर शतकोत्तर रौप्य महोत्सवी संगीत शारदा या नाटकातील नाट्यप्रवेश सादर केला.उपस्थितानी गाण्यांना व नाट्य प्रवेशाला वन्स मोअर ची दाद दिली.

माखजन इंग्लिश स्कूल च्या गुरुदक्षिणा सभागृहात झालेला हा कार्यक्रम उत्तरोत्तर रंगत गेला.
या कार्यक्रमात गंधार संकपाळ श्रावणी संकपाळ,सूरज पाटणकर सृष्टी तांबे,ऋचा पातकर,पवन मोहिते,काव्या बागवे,आदित्य पानगले,अथांग कारंडे,अनुष्का कदम,रिया जाधव,हर्षदा चव्हाण यशोदीप मोहरीर,गंधार पुरोहित
कनक म्हापुस्कर मुग्धा जोशी,अक्षता दिंडे,कैवल्य मुसळे ओजस कुंटे,मेघ देवळेकर,सुखदा साठे,जुईली केळकर,कल्याणी साठे,वेदिका मोरे आदिनी भाग घेतला. कार्यक्रमावेळी माखजन पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष आनंद साठे,कलांगण चे अमोल लोध यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.हा कार्यक्रम ज्ञानप्रबोधिनी चे कार्यकर्ते व मा.पं.शि.प्र.मंडळ माखजन चे संचालक पराग लघाटे यांनी बसवला होता.त्यांची मध्यंतरात, कलांगण कार्यकर्ते व प्रख्यात निवेदक निबंध कानिटकर यांनी मुलाखत घेतली.या कार्यक्रमाला माखजन पंचक्रोशी सह संगमेश्वर तालुक्यातील रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी श्रीनिवास पेंडसे,दिलीप जोशी,श्रीकांत फाटक,आशिष सरमोकादम,संदेश पोंक्षे,मनोज शिंदे,स्वप्नील बापट,प्रकाश रेडीज, कार्यक्रमा अंती आनंद साठे यांनी आभार मानले.