वाहनचालकांची दमछाक, अपघातांचा धोकाही कायम
खेड(प्रतिनिधी)
मुंबई – गोवा महामार्गावरील कशेडी बोगद्यातून दुतर्फा वाहनचालकांचा प्रवास सुस्साट झाला असला तरी कशेडी घाटातील रस्त्याची चाळण झाली आहे. रस्त्याच्या दयनीय अवस्थेमुळे अवजड वाहतुकीच्या वाहनांसह एसटी बसचालकांना जीवघेणा प्रवास करावा लागत आहे.
महामार्गावरील कशेडी बोगद्यातून दुतर्फा वाहतूक सुरू असली तरी अवजड वाहतुकीच्या वाहनांसह एसटी बसेसना बोगद्यातून प्रवेश नाकारण्यात आला आहे. यामुळे घाटातील मार्गावरूनच एसटीसह अवजड वाहतूकदारांना मार्गस्थ व्हावे लागत आहे. घाटातील मार्ग उखडला असून जागोजागी मोठे खड्डे पडले आहेत. अवजड वाहनांसह एसटी बसेस व इतर वाहने जुन्या घाटमाथा मार्गातून कशेडी बंगलामार्गे मार्गस्थ होतात. खड्ड्यांतूनच घाट उतरून मार्गस्थ व्हावे कशेडी बंगला हा रायगड व रत्नागिरी लागत आहे. गणेशोत्सव महिनाभरावर सीमेवर असल्याने रायगड हद्दीतील येवून ठेपलेला असतानाही मार्ग भोगावजवळील रस्ता सोडल्यास सुस्थितीत आणण्यासाठी आणण्यासाठी राष्ट्रीय पोलादपूर ते कशेडी रस्ता वाहतुकीस महामार्ग खात्याला अजूनही सवडच मिळली नसल्याने संताप व्यक्त होत आहे











