दापोली | प्रतिनिधी: डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ आणि “कृषीसखी “व “मृदगंध” या गटा अंतर्गत कृषी तंत्रज्ञान मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाचे आयोजन गावातील सदस्य, ग्रामस्थ , व अभियांत्रिकी विषय विशेष तज्ञ डॉ सचिन पाठक, कार्यक्रम अध्यश डॉ. प्रवीण झगडे व विषय विशेष तज्ञ डॉ. महेश कुलकर्णी सर त्यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केला गेला. पूर्व प्राथमिक जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक महेंद्र जालगांवकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाचे आयोजन खानजाई मंदिरात करण्यात आले होते. या प्रसंगी व्यासपीठावर डॉ. सचिन पाठक , डॉ. महेश कुलकर्णी, गावातील ग्रामअध्यक्ष श्रीकांत रेवाळे , ग्राम उपाध्यक्ष किसन जाधव, ग्रापंचायत सदस्य गणेश चीपटे व महिला मंडळ अध्यक्षा सौ प्राजक्ता मोहिते उपस्थित होत्या. आभियांत्रिकी विषय विशेष तज्ञ डॉ सचिन पाठक यांनी ग्रामस्थांना शेती विषयक मार्गदर्शन केले व शेतीतील सर्व अवजारांची ओळख करून दिली. सुत्र संचनालय शामल दुधाळ, मृणाल मेटील व मेधावी शिंदे ह्यांनी सांभाळले.
कार्यक्रमाला किन्हाळ जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा येथील शिक्षक, सर्व शेतकरी, गावातील महिलांनी उत्स्फूर्तपणे उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घेतला. कार्यक्रमाचे आयोजन डॉ. सचिन पाठक व सर्व ग्रामस्थांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.










