मंडणगड येथे मुद्रांक विक्रेत्यामुळे कृत्रिम तुटवडा केल्याने शेतकरी वर्ग व नागरीकांची गैरसोय एजंट व जमीन खरेदीदारांसाठी अवेळी देखील मुद्रांक देत असल्याची नागरीकांची तक्रार

 

 

मंडणगड l प्रतिनिधी-मंडणगड तालुक्यात सध्या 3 अधिकृत मुद्रांक विक्रेते असून त्यातील 2 मुद्रांक विक्रेते हे नियमित मुद्रांक विक्री करीत असतात. यामध्ये त्यातील एक मुद्रांक विक्रेता हा आपल्याकडे प्रतिज्ञापत्र अथवा कोणताही करार आपल्या ठिकाणी करण्याच्या अटीवर मुद्रांक देत असतो. त्यामध्ये कोणत्याही प्रकारे खरेदी व विक्रीबाबत किंवा प्रतिपत्राबाबत काही टायपींगचे काम करण्यात येणार नसल्यास त्या नागरीकांना मुद्रांक दिले जात नाही तसेच विद्यार्थ्यांना देखील अव्वाच्या सव्वा टायपिंग चार्जेस लावले जातात. तसेच टायपिंग करणार नसल्याने मुद्रांक संपले आहेत असे सांगून तालुक्यातील सुमारे 40 कि.मी. अंतरावरून येणारे वि‌द्यार्थ्यांना व शेतकरी वर्गास निराशेने परत जावे लागते. काही दिवसापूर्वी तर तहसिलदार महोदयांनी विद्यार्थीनीच्या तक्रारीवरून सदरच्या मुद्रांक विक्रेत्याचे कार्यालयावर भेट देत पंचनामा केला असता त्याठिकाणी 100 चे 500 चे मुद्रांक असल्याचे सापडून आले यावर तसा पंचनामा देखील तहसिलदार यांनी केलेला आहे.

 

या मुद्रांक विक्रेत्याबाबत वारंवार तक्रार होत असून त्याची सर्व सामान्य नागरीक याचे वागणूकीला त्रस्त झालेले असून त्याचे मुद्रांक विक्री परवानाच रद्द करण्यात यावा अशी मागणी तालुक्यातून जोर धरत असून यामध्ये जिल्हा कोशागार यांनी याबाबत त्यांची कार्यालयीन चौकशी करण्याची मागणी तालुक्यात जोर धरत आहे.