खेड(प्रतिनिधी) पावसाळ्यात नैसर्गिक आपत्ती उदूभवल्यास अडथळ्यांवर मात करण्यासंदर्भात एनडीआरएफ पथकाने येथील मदतकर्त्यांना जगबुडी नदीपात्रात प्रात्यक्षिके दाखवून मार्गदर्शन केले.
तहसीलदार सुधीर सोनावणे, पोलीस निरीक्षक नितीन भोयर यांच्या मार्गदर्शनाखाली एनडीआरएफ पथकामार्फत शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. एडीआरएफच्या पथकाने जगबुडी नदीपात्रात विविध प्रकारची प्रात्यक्षिके करून दाखवली. या
उपक्रमात विसर्जन कट्टाचे सदस्यही सहभागी झाले होते.










