दोडामार्ग | सुहास देसाई : सिंधुदुर्ग जिल्ह्यात शैक्षणिक वर्ष 2023 – 24 मध्ये घेण्यात आलेल्या युवा संदेश प्रतिष्ठानच्या सिंधुदुर्ग टॅलेंट सर्च परिक्षेत नवोदय विद्यालय सांगेली ता.सावंतवाडी मधील कु. तनिष्का अशोक भोसले इयत्ता – 6 वी हिला गोल्ड मेडल मिळाले तिच्या या यशाबद्दल कणकवली येथे झालेल्या युवा संदेश प्रतिष्ठानच्या कार्यक्रमात मेडल रोख रक्कम व प्रशस्तिपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
या कार्यक्रमाला शालेय शिक्षण व भाषा मंत्री ना.दिपकभाई केसरकर , आमदार नितेशजी राणे ,जिजाऊ प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री निलेशजी सांबरे, युवा संदेश प्रतिष्ठानच्या अध्यक्षा सौ संजना सावंत युवा प्रतिष्ठानचे सर्वेसर्वा श्री संदेशजी सावंत व इतर मान्यवर उपस्थित होते तसेच या वर्षी झालेल्या गणित ऑलम्पियाड परीक्षेतही तिने गोल्ड मेडल मिळविलेले आहे तिच्या या यशाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे












