महेश उर्फ मुन्ना खामकर भाजपा जिल्हा उपाध्यक्ष पदावरून कार्यमुक्त

 

रत्नागिरी । प्रतिनिधी
लांजा येथील महेश उर्फ मुन्ना खामकर हे भारतीय जनता पक्षाच्या रत्नागिरी जिल्हा कार्यकारिणीमध्ये उपाध्यक्ष या पदावर कार्यरत होते. श्री. खामकर यांना या पदावरून कार्यमुक्त करण्याचे आदेश जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी दिले आहे. याबाबतचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही, शुक्रवारी सकाळी जिल्हाध्यक्षानी हे आदेश दिले आहेत.