आंब्याचा झाडास गळफास लावून आत्महत्या ; देवगड पवनचक्की साटमवाडी येथील घटना 

Suicide by hanging from a mango tree; Incident at Devgad Windmill Satamwadi

देवगड :प्रतिनिधी

दारूच्या नशेत देवगड पवनचक्की साटमवाडी येथील प्रकाश आत्माराम साटम (५५) यांनी आंब्याचा झाडास दोरीने गळफास लावूनआत्महत्या केली.ही घटना २५ एप्रिल रोजी सकाळी ११ वा.सुमारास घडली.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, देवगड पवन चक्की साटमवाडी येथील प्रकाश साटम यांनी दारूच्या नशेत मंगळवारी सकाळी ११ वा.सुमारास घरासमोर असणा-या बागेतील आंबा कलमाला दोरीच्या सहाय्याने गळफास लावून आत्महत्या केली.गळफास लावलेल्या स्थितीत त्याच्या पत्नीने पाहिल्यानंतर तिने आरडा ओरड करून घरातील माणसांना सांगीतले.त्यानंतर पोलिसांना कळविण्यात आले.पोलिसांनी घटनास्थळी जावून घटनेचा पंचनामा केला.

प्रकाश साटम हा पत्नी व दोन मुली तसेच भाऊ व त्यांचा परिवार यांच्या समवेत राहत होता.त्याची एक मुलगी मुंबई येथे असून तो नौकेवर मच्छिमारी करण्यासाठी जात असे.त्याला दारूचे व्यसन होते.घटनेची खबर त्याचा भाऊ आनंद आत्माराम साटम यांनी देवगड पोलिसस्थानकात दिली असून पोलिसांनी आकस्मिक मृत्यु म्हणून नोंद केली आहे.तपास पो.हे.कॉ.राजन जाधव करीत आहेत.