मालवण शहरातील एका बॅक अधिकाऱ्याला मुंबई पोलिसांनी घेतले ताब्यात

मुंबईत दाखल एका गुन्हा प्रकरणी कारवाई

मालवण | प्रतिनिधी : मुंबई येथे फसवणूक व अन्य गुन्हे प्रकरणातील एक संशयित आरोपी सध्या वास्तव्य मालवण शहरात एक बँक अधिकारी याला मुंबई गुन्हा अन्वेषण शाखा दहाच्या पथकाने मालवणात दाखल होत ताब्यात घेत मुंबईला नेले आहे. याबाबत माहिती मालवण पोलीस निरीक्षक विजय यादव यांच्या वतीने देण्यात आली आहे.

संशयित हा शहरातील एका बँकेत असल्याची माहिती मिळाली आहे. सहायक पोलीस निरीक्षक गणेश तोडकर, पोलीस कर्मचारी धारगळकर, खेडेकर हे मुंबई पोलीस पथक मालवणात दाखल झाले. त्यांनी संशयित आरोपी राजेश बोभाटे याला ताब्यात घेतले. त्यानंतर ते मुंबई येथे रवाना झाले आहेत.