माखजन |वार्ताहर : संगमेश्वर तालुक्यातील बुरंबाड येथील श्री देव विष्णू मंदिरात यावर्षी गोकुळ अष्टमी उत्सवाचा शतकोत्तर सुवर्ण महोत्सव साजरा होत आहे.
या उत्सवानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे.
हा उत्सव २३ ते २७ ऑगस्ट या कालावधीत साजरा होणार आहे.
यामध्ये २३ व २४ रोजी श्रींची पवनाभिषेक पूजा,आरती मंत्रपुष्प,व रात्री कीर्तन होणार आहे.तर २५ रोजी सकाळी पवनाभिषेक पूजा,प्रधान संकल्प ,पुण्याहवाचन,मुख्यदेवता, नवग्रह स्थापना श्रींवर पावमान पंचसूक्त,अभिषेक महापूजा,मुख्य हवं,बलिदान पूर्णाहुती,दुपारी ३ वाजता माहेरवाशिणी व सासुरवशींणी यांचा स्नेहमेळावा,आरती मंत्रपुष्प व कीर्तन होणार आहे.
२६ रोजी श्रींची पवनाभिषेक पूजा,आरती,छबिना व रात्री श्रींच्या जन्माचे कीर्तन होईल.
तर २७ रोजी सकाळी श्रींची पवनाभिषेक पूजा,कीर्तन,गोपाळकाला,महाप्रसाद होईल.तर रात्री १० वाजता श्री विष्णू प्रासादिक नाट्य मंडळाचे,श्री पराग लघाटे(आरवली)लिखित एक नव कोर,सामाजिक,कौटुंबिक ‘वास्तू तथास्तु’ हे नाटक होणार आहे.याचे दिग्दर्शन रंगकर्मी श्री आनंद साठे यांनी केले आहे.
तर रात्री २ वाजता लळीताचे कीर्तन होणार आहे.
उत्सवानिमित्त होणाऱ्या विविध कार्यक्रमांना उपस्थित राहावे असे आवाहन श्री विष्णू देव न्यासाचे अध्यक्ष श्री लक्ष्मण साठे व श्री सचिव विकास जाधव यांनी केले आहे.











