.
जिल्हा परिषद पुर्ण प्राथमिक आदर्श शाळा तवसाळ तांबडवाडी तालुका गुहागर जिल्हा रत्नागिरी मध्ये ७८ वा स्वातंत्र्य दिन मोठ्या संख्येने व उत्साहात साजरा करण्यात आला. नियोजन बद्ध कार्यक्रम सकाळी – ७.३० वाजता ध्वजारोहण (मुख्याध्यापक) यांच्या वतीने करण्यात आले.
सकाळी – ८.०० वा. ढोल ताश्यांच्या तालावर लेझीम नृत्य करत, प्रभातफेरी व त्यात दिलेल्या देशभक्तीपर घोषणा, आणि त्यामागून त्यांचा पालकवर्ग, त्यानंतरच झेंडावंदन, देशाचा जयजयकार,जिल्हा परिषद शाळा खऱ्या अर्थाने स्वतःमध्ये आणि समाजामध्ये परिवर्तन घडवून आणत आहेत.
सकाळी ९ वा. बालसभा संपन्न झाली, शाळा कमिटी शिक्षक पालक चे सर्व सदस्य समस्त
अध्यक्ष श्री रमेश कुरटे, उपाध्यक्ष : सै. वैष्णवी दिपक निवाते,माजी- सरपंच सौ. नम्रता वसंत निवाते ज्येष्ठ ग्रामस्थ श्री. कृष्णा सोनू वाघे, श्री महादेव भिकु करटे,श्री महादेव वाघे श्रो चंद्रकांत निवाते,श्री. काशिनाथ कुळये, श्री बारकू निवाते, श्री. बबन कुरटे श्री. मंगेश पारदळे , श्री. दिनेश कुरटे , सर्व ग्रामस्थ महिला युवा वर्ग विद्यार्थिनी उपस्थित होते, नंतर सर्व मुलांनी स्वतंत्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या. मान्यवर व विद्यार्थ्यांची भाषणेही झाली.
तसेच श्री दिपक तुकाराम कुळये यांनी सलग तिसरे वर्षी विद्यार्थ्यांना भेट वस्तू त्यांच्या मातोश्री श्रीमती गंगाय तुकाराम कुळये यांच्या हस्ते मुलांना आणि पेन, पैन्सिल, खोडरबर कैचपैन,पट्टी , चित्रकलेसाठी तेलकट खडू दिले आणि शिक्षकांना पेन वाटप केले Dj सचिन कुळये यांनी कार्यक्रमाला रंग भरण्यासाठी तिरंगी फुगे व झेंडे विद्यार्थींना देऊन उत्साह वाढवला , शेवटी खाऊ वाटपाचा कार्यक्रम करू कार्यक्रमाची सांगता केली.
शाळांमधील शिक्षक वृंद कु.अंकुश मोहिते सर
श्री संदिप भोये सर ,श्री.गोकुळ गोविळ सर,कु.साईनाथ पुंजारा सर आलेल्या मु.पो. तवसाळ तांबडवाडी मधील सर्व ग्रामस्थ महिला मंडळ युवा वर्ग विद्यार्थिनी उपस्थित मान्यवर शिक्षक वृंद यांचे शाळेच्या वतीने आभार व धन्यवाद मानले












