प्रतिनिधी/ रोहन कांबळे
राधानगरी : नवरा आणि सासू सासरा यांच्या रोजच्या छळाला कंटाळून राधानगरी तालुक्यातील कुंभारवाडी येथील विवाहित महिलेने रविवारी दि.१८ ऑगस्ट रोजी थिमिट प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. कविता सताप्पा पाटील (वय ३८) असे महिलेचे नाव आहे. कविताचे माहेर हे राधानगरी तालुक्यातील ठिकपुर्ली येथील असून १९ वर्षापूर्वी तिचे लग्न साताप्पा पाटील यांच्याशी झाले होते. लग्नानंतर दोन मुले झाल्यानंतर देखील सासू सासऱ्याचा छळ चालू केला होता. नवऱ्याचे गावातीलच एका महिलेशी अनैतिक संबंध होते.यावरूनच दोघांमध्ये नेहमी वाद व्हायचे. या कारणावरून तिने आज आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या घटनेनंतर तिला राधानगरी येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले.पुढील उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल केले आहे.या घटनेची नोंद राधानगरी पोलिस ठाण्यात झाली आहे.










