प्रतिनिधी/रोहन कांबळे
कोल्हापूर: १५ ऑगस्ट २०२४ ची सकाळ कोल्हापुरात सर्वत्र स्वातंत्र्य दीन साजरा करण्याचा आनंदोत्सव सुरू असतानाच राजारामपुरी पोलिस ठाण्यात दोन मृतदेह राजाराम तलावात तरंगत आहेत अशी वर्दी मिळाली. पोलिस घटनास्थळी पोहचताच मृतदेहाच्या पाठीवर असलेल्या सॅक मधील कागदपत्रांमध्ये मृतदेहांची ओळख पटली. भूषण कुलकर्णी आणि भाग्यश्री कुलकर्णी ही मृतदेहांची नावे. दोघे बहीण भाऊ असल्याचे समजले.पुढे मृतदेह शवविच्छदनासाठी सिपीआर रुग्णालयात नेण्यात आले. भूषण आणि भाग्यश्री हे दोघे ही उच्चशिक्षित.भाग्यश्री ही पेश्याने वकील होती.पण काही महिन्यांपूर्वी यांच्या आईचे दुःखद निधन झाले अन् दोघांना ही मोठा धक्का बसला.
आई गेल्यानेच आम्ही आमचे जीवन संपवत आहोत आम्ही हा टोकाचं निर्णय घेत आहोत असे त्यांनी लिहिल्या सुसाइड नोट वरून स्पष्ट झाले. पण जाता जाता आपल्या आईची ईच्छा पुर्ण केली. आपल्या जवळील धन गरजुंसाठी दान करावे.अशी त्यांच्या आईची इच्छा होती.म्हणून आईच्या स्मरणार्थ दोघांनी संस्कृत विषयाशी संबंधित शाळा मंडळाला २५ लाखांची देणगी दिली.











