मेष रास
आज निर्णय घेताना अडचणी येतील. द्विधा मनस्थिती होईल. आज प्रॉब्लेम आहे किंवा होतो आहे ते मान्य करा अन्यथा त्यावर उपाय मिळणे तर दूर परंतु अडचणी सतत येत राहतील. जुन्या गोष्टींवर आज नव्याने वादविवाद होतील. शांत राहणेच शहाणपणाचे होईल. महत्त्वाचे निर्णय पुढे ढकला.
वृषभ रास
आज आशादायक परिस्थिती असेल. तुम्हाला मदत मिळत राहील. कामे अडणार नाहीत. पुढच्या योजना आखा आणि त्यानुसार प्लॅनिंग करा. तुम्ही आज योग्य मार्गावर आहात. काही आनंददायक घटना घडतील.
मिथुन रास
आज विचार करून काम करा. एखादी अशी घटना घडू शकते जिथे धावत पळत तुम्हाला जावे लागेल किंवा तिथे लक्ष घालावे लागेल. पटापट निर्णय घ्यावे लागतील. निर्णय घेण्यात चूक झाली तरी त्याचा परिणाम त्रासदायक असेल. बाकी कामात यश मिळेल. इतरांवर तुमचा प्रभाव पडेल.
कर्क रास
आज नवीन काम, प्रोजेक्ट्स, मिळवण्यासाठी प्रयत्न करा. पैशाशी संबंधित कामे होतील. लग्नासाठी चांगले प्रपोजल मिळेल. लाईफस्टाईल मध्ये बदल करण्यासाठी आज पासून प्लॅनिंग करा.
सिंह रास
आज प्रेमाचा अनुभव तुम्हाला घेता येईल. प्रत्येक गोष्ट मन लावून करा. निर्णय घेताना मनाचे ऐका. आजारपणातून सुटका व्हावी म्हणून प्रयत्न करा. योग्य थेरपीस्ट, डॉक्टर मिळेल. नातेसंबंधात सुधारणा होइल. प्रेमाचे प्रपोजल देण्या घेण्यासाठी विचार करू शकता.
कन्या रास
आज भराभर घटना घडतील, तयार राहा. वेगवेगळ्या लेव्हलवर तुम्हाला एकाच वेळी काम करावे लागेल. चांगल्या बातम्या कळतील. एकदा काही सुरू झाले की ते थांबवता येणार नाही, म्हणून विचार करून निर्णय घ्या. इमर्जन्सीसाठी काही वेळ, पैसे तयार ठेवा, तसेच सपोर्ट घेण्याचा प्रयत्न करा.
तुळ रास
आज भरपूर काम करावे लागेल. इतरांची मदत काम करताना घ्या. स्ट्रेस चा परिणाम हेल्थ वर होईल. हेल्थ ची काळजी घ्या. लाईफचा बॅलन्स घालू शकतो.
वृश्चिक रास
आज इतरांची विचारपूस करा. बेपर्वा वागू नका. मनापासून इतरांना मदत करा. तुमच्या सल्ल्याचा इतरांना उपयोग होईल. विचारून मग कामे करा. कामात स्पष्टता ठेवा.
धनु रास
आज नवीन काहीतरी करायला मिळेल. ह्या कामातून आनंद आणि समाधान मिळेल. गुड न्यूज मिळेल. प्रामाणिकपणे काम करा आणि तुमचे ओरिजनल काम इतरांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा.
मकर रास
आज चुकीच्या गोष्टी तुमच्या हातून घडू शकतात. प्रत्येकाच्या वागण्याच्या मागचा हेतू तपासण्याचा प्रयत्न करा. खरे खोटे तुमच्यासमोर येईल. भांडण वादविवादा पासून लांब राहा.
कुंभ रास
आज नव्या गोष्टींची सुरुवात होईल. नातेसंबंधात सुधारणा होईल. प्रेम विवाहाचा विचार करू शकता. नवीन घरासाठी विचार करू शकता.
मीन रास
आज नेहमीच्या पद्धतीने विचार केल्यास प्रॉब्लेम सुटणार नाहीत. अशा काही घटना घडतील ज्यामुळे विचारांमध्ये परिवर्तन होईल. कामे होणार नाहीत. ठरवलेल्या कामात प्रोजेक्टमध्ये अडथळे येतील.
@Ritikaslifetherapies
रितिका –
ज्योतिष सल्लागार, अध्यात्मिक मार्गदर्शक
पुणे.
कॉन्टॅक्ट: 9049680353
++++++++++++++++++++++++++++










