Sawantwadi | स्वतःसह चिमुरड्या मुलांचा अंगावर ओतले पेट्रोल 

घरगुती भांडणातून सावंतवाडी बाहेरचावाडा येथील प्रकार 

मुलावर उपचार सुरू : वडिलांना घेतले पोलिसांनी ताब्यात 

सावंतवाडी । प्रतिनिधी : घरगुती भांडणातून स्वतःसह आपल्या चार वर्षाच्या कोवळ्या मुलावर पेट्रोल ओतण्याचा प्रकार करणाऱ्या निर्दयी वडिलांना सावंतवाडी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर त्या चार वर्षाच्या मुलावर सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

आरमान हुसेन गडियाली (४) असे या मुलाचे नाव आहे. त्याच्या नाका तोंडात पेट्रोल गेल्याने त्याची प्रकृती बिघडल्याने त्याला उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारानंतर त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप सावंत यांनी दिली.

दरम्यान, याबाबत स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार हुसेन गडियाली याने आपल्या अन्य दोन मुलांवरही पेट्रोल ओतले होते. मात्र त्यांना कोणतीही इजा झाली नाही. पोलिसांनी हुसेन गडियाली याला ताब्यात घेतले असून पोलीस ठाण्यात त्याची कसून चौकशी सुरू आहे. दरम्यान हा प्रकार घरगुती वादातून झाल्याची माहिती पोलिसांनी वर्तवली आहे.याबाबतची माहिती सामाजिक कार्यकर्ते राजू मसुरकर यांनी दिली आहे.