4 सप्टेंबर पूर्वी 550 कंत्राटी वीज कामगारांचा पगार द्या : कामगार नेते अशोक सावंत 

 

 

महावितरणच्या कायम कर्मचारी रिक्त जागांवर बाह्यस्रोत कंत्राटी कामगार ऑपरेटरना त्वरित नियुक्ती मिळावी 

कामगारांना आयकार्ड, ईएसआयसी कार्ड, टूलकिट त्वरित मिळावे

महावितरण कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांवर अधिक्षक अभियंता, विभागीय कार्यकारी अभियंता यांच्यासोबत सकारात्मक चर्चा 

कुडाळ : कुडाळ महावितरण सर्कल अधिक्षक अभियंता अशोक साळुंखे तसेच कुडाळ विभागीय कार्यकारी अभियंता श्री. वनमोरे यांची कामगार नेते अशोक सावंत तसेच वीज कंत्राटी कामगार संघ, सिंधुदुर्ग चे पदाधिकारी यांनी कामगाराच्या विविध प्रश्नांसाठी भेट घेतली.

 

कुडाळ डिव्हिजनमधील कायम कामगारांच्या रिक्त जागेवर, कंत्राटी कामगारांना त्या जागेवर 1 आठवडा झाला, तरी अजूनही ऑपरेटर या पदावर हजर होण्यासाठी ऑर्डर देण्यात आली नसल्यामुळे, त्यांची गैरहजेरी लागत आहे. या संदर्भात ऑपरेटर व लाइनस्टाफ सबंधित ठेकेदाराला सांगून त्वरित कामगाराना कामाची ऑर्डर देवून कामावर हजर करण्यात यावे, असे महावितरण प्रशासनाला सांगण्यात आले. यावर महावितरण प्रशासन यांनी संबंधित ठेकेदारला कंत्राटी कामगारांना त्वरित ऑर्डर देण्यासाठी सांगितले. तसेच कामगारांच्या कामाची वेळ किती आहे हे सांगावे त्यांनी किती तास काम करावे यावर चर्चा करण्यात आली.

 

पुढील महिन्यात गणेश चतुर्थी असल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील काम करत असलेल्या सुमारे 550 कंत्राटी कामगारांचा पगार सप्टेंबर 2024 महिन्याच्या 04 तारीखच्या अगोदर देण्यात यावे, अशा सूचना कंपनी प्रशासनाने संबंधित ठेकेदाराना द्यावे, अशी मागणी देखील करण्यात आली.

 

दोन दिवसांपूर्वी ओरोस सेक्शन ऑफिसमधील चेतन बिड्ये या कामगाराचे आकस्मित निधन झाले, त्याची 72 तासाच्या आत ESIC ऑफिसला नोंदणी करणे गरजेचे आहे.त्यामुळे ती नोंदणी त्वरित करण्यात यावी, जेणेकरून त्याचा कुटुंबाला आर्थिक मदत मिळेल, असे संघटनेच्या वतीने मांडण्यात आले.

 

यावेळी कामगार नेते अशोक सावंत , वीज कंत्राटी कामगार संघ, सिंधुदुर्ग अध्यक्ष संदीप बांदेकर, सचिव योगराज यादव, गणेश राऊळ, करण परब, शुभम केरकर , संकेत शिंदे, अजित पालकर, मुरलीधर देसाई आदी उपस्थित होते.