एस.एम. हायस्कूल, कणकवली द्वितीय तर न्यू शिवाजी हायस्कूल, जांभवडे तृतीय
सावंतवाडी । प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात शेठ म.ग. हायस्कूल, देवगड यांनी प्रथम क्रमांक पटकावला. एस.एम. हायस्कूल, कणकवलीला द्वितीय क्रमांक तर न्यू शिवाजी हायस्कूल, जांभवडे, कुडाळला तृतीय क्रमांक मिळाला. या नाट्योत्सवामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आठ तालुक्यांतील प्रथम क्रमांक पटकावलेल्या संघांनी सहभाग घेतला आणि विभागीय स्तरासाठी संघ निवड करण्यात आला.
राष्ट्रीय विज्ञान संग्रहालय परिषद, संस्कृती मंत्रालय, भारत सरकार, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे, नेहरू विज्ञान केंद्र, वरळी, मुंबई, राज्य विज्ञान शिक्षण संस्था, रविनगर, नागपूर, विभागीय शिक्षण उपसंचालक, कोल्हापूर विभाग, कोल्हापूर, शिक्षणाधिकारी (माध्यमिक), जि. प. सिंधुदुर्ग, सिंधुदुर्ग जिल्हा विज्ञान मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय विज्ञान नाट्योत्सवाचे आयोजन बॅ. नाथ पै सभागृहात करण्यात आले.
दरम्यान, उत्कृष्ट अभिनय पुरुषाचा पुरस्कार कुमार सम्यक सकपाळ, शेठ म. ग. हायस्कूल, देवगड यांना मिळाला तर स्त्री वर्गात कुमारी अनुष्का प्रशांत पोकळे, शेठ म.ग. हायस्कूल, देवगड व कुमारी पूर्वा संतोष सावंत, एस.एम. हायस्कूल, कणकवली यांना मिळाला. उत्कृष्ट दिग्दर्शिका पुरस्कार श्रीमती आज्ञा कोयंडे, शेठ म.ग. हायस्कूल, देवगड यांना तर उत्कृष्ट लेखक पुरस्कार राहुल कदम, एस.एम. हायस्कूल, कणकवली यांना प्रदान करण्यात आला.
शिक्षणाधिकारी माध्यमिक शिक्षणाधिकारी कविता शिंपी, शिक्षणाधिकारी योजना प्रदीपकुमार कुडाळकर, ना. दीपक भाई केसरकर मित्रमंडळाचे अध्यक्ष राजन पोकळे, सावंतवाडी तहसीलदार श्रीधर पाटील, उपशिक्षणाधिकारी श्रीमती अफसर बेगम औटी, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी श्रीम. स्मिता प्रकाश नलावडे, रामचंद्र आंगणे, प्रेमानंद देसाई, आंबा केसरकर, नंदू शिरोडकर, नंदू गावडे, गुरुनाथ कुसगांवकर यांच्या हस्ते बक्षीस वितरण समारंभ संपन्न झाला. यावेळी विज्ञान मंडळ पदाधिकाऱ्यांचा सन्मान शिक्षणाधिकारी कविता शिंपी, प्रदीपकुमार कुडाळकर आणि तहसीलदार श्रीधर पाटील यांच्या हस्ते करण्यात सत्कार आला.
नाट्योत्सवाच्या यशस्वीतेसाठी सिंधुदुर्ग विज्ञान मंडळाचे अध्यक्ष पांडुरंग काकतकर, उपाध्यक्ष रघुनाथ कारेकर, सचिव प्रकाश कानूरकर आणि सर्व पदाधिकारी यांनी विशेष परिश्रम घेतले. तसेच शाळेतील शिक्षक व विद्यार्थी वर्गाने विशेष योगदान दिले.












