रत्नागिरी : आज सकाळी पावणेसहा वाजण्याच्या दरम्यान पाली येथील पाथरथ मावळट वाडी येथे राहणारे सुभाष शांताराम धाडवे यांची आई इंदिरा शांताराम धाडवे (वय ७५ वर्षे ) यांच्यावर आज गुरुवारी सकाळी घरा शेजारी सकाळी पावणे सहाच्या सुमारास दडी मारून बसलेल्या बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला.
मुलगा सुभाष बाजूला चुलीजवळ पाणी तापवत होता. त्यामुळे त्या वाचल्या कारण तत्काळ पेटलेले लाकूड घेऊन गेल्याने बिबट्या पळून गेला . दरम्यान यात इंदिरा शांताराम धाडवे या गंभीर जखमी झाल्या असून त्यांना पाली येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
सुदैवाने मुलगा आणि इतर माणसं बाजूलाच असल्यामुळे इंदिरा धाडवे यांचा जीव वाचला असला तरी त्यांच्यावर बिबट्याने गंभीरित्या जखमा केल्याचे दिसून येते.










