मेष रास
आज प्रत्येक गोष्टीकडे वेगळ्या नजरेने पाहण्याचा प्रयत्न करा. तुमचा दृष्टिकोन बदलण्याची आज गरज असेल. काम वेळेत पूर्ण होणार नाही. महत्त्वपूर्ण मीटिंग इत्यादी पुढे ढकला. पोटाशी संबंधित त्रास होऊ शकतो. आज स्वतःच्या मनाचे निर्णय घ्या. इतरांचा प्रभाव तुमच्या निर्णय क्षमतेला बाधित करू शकतो.
वृषभ रास
आज आहे ते रीसोर्सेस सांभाळून ठेवा. गुंतवणूक योग्य विचार करून करा. शरीराची काळजी घेण्याची गरज पडेल. भौतिक गोष्टींच्या मागे धावू नका. हेल्थ ची काळजी घेण्याची गरज आहे.
मिथुन रास
आज इतरांना प्रेमाने जिंकण्याचा प्रयत्न करा. इतरांना विरोध केल्यास तुमची कामे अडतील. माफ करा आणि पुढे जा. आज तुमचे शत्रू माघार घेतील. कोणीच तुमच्यासमोर टिकणार नाही. महत्त्वाचे कामे करू शकता.
कर्क रास
आज तुमची जादू चालेल. “मिऱ्याकल” घडताना दिसेल. चुटकी सरशी कामे होतील. रस्त्यात पैसे सापडण्याचे योग आहेत. गणपतीचे दर्शन घ्या. दिवस उत्तम जाईल.
सिंह रास
आज नात्यात गोडवा राहील. पार्टनर सोबत वेळ छान जाईल. पार्टनरला एखादे गिफ्ट देऊ शकता. सिंगल व्यक्तींना प्रेम तसेच लग्नासाठी विचारणा होऊ शकते. आज मन खुश राहील.
कन्या रास
आज इतरांच्या भानगडीत पडू नका. खोड्या करणारी व्यक्ती राहील बाजूला परंतु तुम्हाला अपमानित व्हावे लागेल. कारण नसताना माफी मागावी लागू शकते. डोके दुखणे तसेच इतर शारीरिक त्रास होऊ शकतात.
तुळ रास
आज तुमच्या कामाला न्याय मिळेल. दिवसभरात जे काही कराल त्यात क्रिएटिव्हिटी दिसून येईल. कामाचे कौतुक होईल. फॅशन डिझायनिंग, ज्वेलरी, तसेच कपड्याच्या व्यापारात फायदा होईल. पैशाचे प्रश्न सुटतील.
वृश्चिक रास
आज इतरांना तुमची प्रगती झालेली पहावणार नाही. तुमच्याविषयी खोट्या बातम्या पसरवल्या जातील. तुम्हाला त्रास होईल असे इतरांकडून वागले जाईल. प्रेम तसेच वैवाहिक जीवनात तणावाचे प्रसंग निर्माण होतील.
धनु रास
आजचा दिवस आनंदात जाईल. तुम्ही केलेल्या कष्टाचे फळ तुम्हाला मिळेल. स्वतःला शाबासकी म्हणून आवडत्या गोष्टी करा. स्वतःसाठी खरेदी करा. प्रत्येक बाबतीत आनंद आणि यश मिळेल.
मकर रास
आज तुमच्या आयुष्यात महत्वपूर्ण बदल घडतील. ज्या गोष्टी वर्कआउट होत नाहीत त्यातून बाहेर पडा. एखादी दुःखद बातमी कळू शकेल. मनापासून काही बदल करण्यासाठी आज पासून सुरुवात केल्यास यश मिळेल.
कुंभ रास
आज दिवस तुमचा नाही. जबाबदाऱ्या पूर्ण करता येणार नाहीत. महत्त्वाच्या वस्तू सांभाळून ठेवा. एखादी वस्तू हरवू शकते. चोरी जाऊ शकते. तुमच्या डोळ्यासमोर जे दिसत आहे ते सगळेच खरे नाही हे लक्षात घ्या.
मीन रास
आजच्या आज ठरवून कामे करू नका. लॉन्ग टर्म प्लॅनिंग करावी लागेल अशा योजना पुढे ढकला. येणाऱ्या काळासाठी नवीन काही लाईफ मध्ये घडू शकते. हातात घेतलेल्या प्रत्येक कामात यश येईल. घरात पाहुण्याचे आगमन होऊ शकते. एखादे महत्त्वाचे लेटर पार्सल ऑर्डर आज मिळू शकते.
@Ritikaslifetherapies
रितिका –
ज्योतिष सल्लागार, अध्यात्मिक मार्गदर्शक
पुणे.
कॉन्टॅक्ट: 9049680353
+++++++++++++++++++±++++++++++












