भाजपा तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांचा टोला
मालवण | प्रतिनिधी : जनतेची दिशाभूल करणे, विकासकामांबाबत केवळ निधीची पत्र देणे या पलीकडे आमदार वैभव नाईक हे काहीच करत नाहीत. गेल्या दहा वर्षात त्यांनी पत्रेच दिली. प्रत्यक्षात विकास झालाच नाही. त्या पत्रांचा एकत्रित ढीग केल्यास आ. वैभव नाईक दिसणार पण नाही. असा टोला भाजपा तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांनी लगावला आहे.
मालवण भाजपा कार्यालय येथे कोळंब सरपंच सिया धुरी यांच्या पक्ष प्रवेश संपन्न झाला. यावेळी आमदार नाईक केवळ विकास कामांची पत्रे देतात प्रत्यक्ष विकास होतच नाही. अशी चर्चा रंगली होती. त्याबाबत बोलताना धोंडी चिंदरकर यांनी जोरदार टोलेबाजी केली.
यापुढे मालवण कुडाळाचा सर्वांगीण आणि गतिमान विकास निलेश राणे यांच्या नेतृत्वातच होणार. विकासनिधी खेचून आणण्याची धमक निलेश राणे यांच्यात असून गेल्या अडीज वर्षात त्यांनी ते दाखवून दिले. त्यामुळे यापुढे या मतदारसंघाचा विकास निलेश राणे यांच्या नेतृत्वातच असाच सुरु राहील. असा ठाम विश्वास धोंडी चिंदरकर यांनी व्यक्त केला.












