ग्रामस्थ आक्रमक
माखजन|वार्ताहर : संगमेश्वर तालुक्यातील माखजन पंचक्रोशी मध्ये मागील २५ दिवसापासून आयडिया मोबाईल टॉवर सह रेंज गायब असल्याने ग्रामस्था सह मोबाईल धारक आक्रमक झाले आहेत.
आरवली येथे कार्यरत असलेला आयडिया मोबाईल टॉवर जमीन खचत असलेलं कारण देत जमीनदोस्त केला आहे .मात्र त्या साठी ग्राहकांना कोणतीही पूर्व सूचना दिली नाही.या परिसरात सर्वात पहिल्यांदा आयडिया टॉवर उभा राहील्याने अनेकांनी आयडियाचे सिम घेऊन सेवेचा लाभ घेतला.सद्या सर्वात जास्त ग्राहक हे आयडिया चे आहेत. मात्र अचानक रेंज व टॉवर गायब झाल्याने लोकांमध्ये उद्रेकाची भावना निर्माण झाली आहे . मोबाईल रिचार्ज संपण्यापूर्वी चार दिवस रिंगटोन च्या किंवा मेसेज च्या माध्यमातून आगाऊ माहिती देऊन “आपका रिचार्ज अब खत्म होणे वाला हैं जल्दी हि रिचार्ज करो” असे सांगणारे ,टॉवर प्रशासन सद्या गप्प का आहे असा संतप्त सवाल सद्या ग्राहक विचारत आहे.
अनेकांनी एक, दोन ,तीन महिन्यांचे रिजार्ज नुकतेच मारले असून त्यांचे रिचार्ज वाया जाऊन दिवसाला आर्थिक भुर्दंड बसत
आहे.गेलेला रिचार्ज परत मिळावा अशी भावना इथल्या ग्रामस्थांची आहे . सद्या या परीसरात पोस्ट ऑफिस , बँका , पतसंस्था , महाईसेवा,आदी सह इतर सर्व ऑनलाइन कामे बंद पडल्यामुळे ग्राहक अधिकच संतप्त झाला आहे .
सद्या गणेशउत्सव काही दिवसांवर आला असून चाकरमानी गावाकडे येणार असून अनेक जण आपली ऑफिस कामे ऑनलाईन गावी थांबून पूर्ण करणार असतात. अशा वेळी टॉवर किंवा मोबाईल सेवाच नसेल तर त्यांचे नुकसान मोठ्या प्रमाणावर होणार आहे.माखजन, शिंदे आंबेरी ,कासे ,असावे पेढांबे,आंबव पोंक्षे, सरंद, नारडुवे,धामापूर कळंबुशी, आदी अनेक गावे आयडिया रेंज पासून वंचित आहेत.टॉवर प्रशासनाने लोकांच्या या समस्यांचा तात्काळ विचार करून हि सेवा तात्काळ सुरु करावी अशी मागणी सर्वच स्तरातून होत आहे.
आंबव पोंक्षे गावात जिओ चे नेटवर्क देखील गुल झाल्याने सर्वत्र नाराजीचा सूर उमटत आहे.








