वेंगुर्ले तालुक्यातील विविध भागातील युवकांचा शिवसेनेत प्रवेश…

 

 

शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या नेतृत्वावर व कामावर विश्वास..

वेंगुर्ला: प्रतिनिधी :वेंगुर्ले तालुक्यातील विविध भागातील युवकांनी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून युवासेना जिल्हाप्रमुख हर्षद डेरे, तालुकाप्रमुख स्वप्नील गावडे यांच्या माध्यमातून शिवसेनेत प्रवेश केला.

वेंगुर्ला तालुका युवासेनेच्या वतीने येथील साई डीलक्स हॉल येथे शिवसेना जिल्हाप्रमुख अशोक दळवी, जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर, तालुकाप्रमुख नितीन मांजरेकर, शहरप्रमुख उमेश येरम यांच्या प्रमुख उपस्थितीत व युवासेना जिल्हाप्रमुख हर्षद डेरे, तालुकाप्रमुख स्वप्नील गावडे यांच्या माध्यमातून युवकांचा भव्य पक्षप्रवेश घेण्यात आला. यावेळी सावंतवाडी संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष गजानन नाटेकर, सावंतवाडी खरेदी विक्री संघ उपाध्यक्ष राजेंद्र रेडकर, मळगाव उपविभागप्रमुख संदेश सोनूर्लेकर, एकनाथ हळदणकर, युवासेना वेंगुर्ले शहरप्रमुख संतोष परब, उभादांडा विभागप्रमुख नयन पेडणेकर, उपविभागप्रमुख संजय गावडे आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी युवा कार्यकर्ते सागर गावडे, उमेश आरोलकर, अजित कानडे, प्रज्वल पालव, विशाल राऊत, प्रथमेश पालेकर यांच्यासाहित सुमारे ५० ते ६० युवकांनी शिवसेनेत प्रवेश केला. तर यावेळी युवासेना तालुका सचिव म्हणून सागर गावडे, युवासेना शहर सचिव म्हणून उमेश आरोलकर, युवसेना शहर शाखाप्रमुख म्हणून प्रज्वल पालव, विशाल राऊत, सौरभ राणे, शिवराम सातार्डेकर यांना मान्यवरांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आली.

यावेळी बोलताना जिल्हाप्रमूख अशोक दळवी म्हणाले की, शिवसेना आज महासागर बनत चालला आहे. मंत्री दीपक केसरकर यांच्या माध्यमातून वेंगुर्ल्यात झालेल्या विकास कामांची पोचपावती म्ह्णून आज अनेक युवक शिवसेनेत येत आहेत. प्रवेश केलेल्या सर्व युवकांना शिवसेनेच्या संघटनेत योग्य न्याय देऊन मान-सन्मान राखला जाईल. असे त्यांनी सांगितले.

सावंतवाडी विधानसभा मतदार संघाचे प्रतिनिधित्व करत असताना दीपक केसरकर यांच्यासारखे खंबीर नेतृत्व आपल्या पाठीशी आहे. विविध विकासकामे करत असताना सातत्याने जनतेच्या संपर्कात राहणारा, सर्वसामान्यांच्या सुख- दुःखाकडे पाहणारा नेता म्हणजे दीपक केसरकर आहेत. आणि हाच वारसा घेऊन आम्ही सर्व पदाधिकारी विविध माध्यमातून काम करत आहोत. आपण युवक सुद्धा शिवसेनेच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेची सेवा करण्यासाठी कटिबद्ध राहाल. भविष्यात मंत्री केसरकर यांच्या माध्यमातून आपल्याला सर्वतोपरी सहकार्य केले जाईल असा ठाम विश्वास यावेळी बोलताना सचिन वालावलकर यांनी व्यक्त केला. तर युवकांनी जी शिवसेना पक्षाला ताकद दिलात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांचे हात बळकट केलात याबद्दल सर्वांचे आभार मानतो असे यावेळी तालुका प्रमुख नितीन मांजरेकर यांनी सांगितले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन युवासेना तालुकाप्रमुख स्वप्नील गावडे यांनी तर आभार प्रदर्शन जिल्हाप्रमुख हर्षद डेरे यांनी केले.