खेडमधील केवळ ४६ शाळा-महाविद्यालयांमध्ये ‘सीसीटीव्ही’

 

प्रतिनिधी | खेड : बदलापूर येथे चिमुरडींवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेनंतर शालेय विद्यार्थ्यांसह विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने शासनाने विविध शैक्षणिक संस्थांसह शाळा- महाविद्यालयांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बंधनकारक केले आहेत. तालुक्यात केवळ ४६ शाळा-महाविद्यालयांमध्येच सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर असल्याची बाब समोर आली आहे.

 

अत्याचार प्रकरणानंतर अन्य शाळा- महाविद्यालयांसह खासगी संस्थांच्या विद्यालयांकडूनही शासनाच्या आदेशाची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने कार्यवाही सुरू झाली आहे.

बदलापूर येथे दोन चिमुरडींवर झालेल्या अत्याचार प्रकरणाचे पडसाद संपूर्ण राज्यात उमटले आहे. घटनेपूर्वी शाळा-महाविद्यालयांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यासाठी दिरंगाई करणाऱ्यांना शासनाने चपराक. लगावली आहे. तालुक्यातील काही शिक्षण संस्थांच्या खासगी विद्यालयांमध्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची ‘नजर’ आहे. शाळांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरे बंधनकारक केल्याने प्रत्यक्ष कार्यवाहीसाठी शाळा-महाविद्यालये पुढे सरसावली आहेत. यामुळे पालकांनाही दिलासा मिळाला आहे.