चिपळूण (प्रतिनिधी):– श्रावणी सोमवारी भारतीय जनता पार्टी चिपळूण शहर मंडल च्या वतीने चिपळूण शहरातील देवस्थानात दर्शना साठी येणाऱ्या भाविकांना उपवास खिचडी चे वाटप करण्यात येते. चौथ्या श्रावण सोमवारी दिनांक -26-08-2024 उपक्रमांतर्गत श्री देव गौतमेश्वर मंदिर येथे खिचडी वाटप करण्यात आले.
या उपक्रमाला भक्तगणांनी उत्तम प्रतिसाद दिला. यावेळी प्रसाद वाटप करण्यासाठी शहर मंडल अध्यक्ष श्री श्रीराम शिंदे, सरचिटणीस सारिका भावे, विनायक वरवडेकर, माजी नगरसेविका रसिकाताई देवळेकर, नुपूर बाचीम,माजी नगरसेवक विजय दादा चितळे, माजी नगरसेवक आशिषजी खातू त्याचबरोबर शहर उपाध्यक्ष राकेश घोरपडे, निकीला रतावा,युवा मोर्चा शहराध्यक्ष संदीप भिसे, उल्हास भोसले, सुनील जांभेकर, अमृता जोशी, श्रद्धा कदम, विमल लड्डा साधना कात्रे, जान्हवी शिंदे व इतर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.











