तळवली येथील दहीहंडी फोडण्याचा मान स्वयंभू सोमनागेश्वर गोविंदा पथक भेळेवाडीला

शृंगारतळी,मुंढर येथे मनसेच्या दडहिंदीला दिली 4 थराची यशस्वी सलामी

तळवली गाव हौशी युवा मंडळाचे आयोजन

गुहागर | प्रतिनिधी : तालुक्यातील तळवली हॉस्पिटल स्टॉप येथे तळवली गाव हौशी युवा मंडळाची दहीहंडी फोडण्याचा मान श्री स्वयंभू सोमनागेश्वर गोविंदा पथक भेळेवाडीने पटकावला.
तर शृंगारतळी व मुंढर येथील मनसेच्या दहीहंड्याना 4 थराची यशस्वी सलामी देऊन स्वयंभू सोमनागेश्वर भेळेवाडी गोविंदा पथकाने आपली छाप पाडली.

 

 

याठिकाणी दरवर्षी सर्वांसाठी आकर्षण ठरणाऱ्या दहीहंड्या असतात.यावेळी सलग दुसऱ्यावर्षी ही दहीहंडी तळवली गाव हौशी युवा मंडळाने आयोजित केली होती या दहीहंडीसाठी विविध पारितोषिके देखील होती.ही दहीहंडी फोडण्याचा मान अखेर श्री स्वयंभू सोमनागेश्वर गोविंदा पथक भेळेवाडीने पटकावला.यावेळी रोख रु. 2 हजार 222 व आकर्षक सन्मानचिन्ह देऊन या गोविंदा पथकाला गौरविण्यात आले.अन्य गोविंदा पथकांनी देखील याठिकाणी 4 थरांची सलामी देऊन पारितोषिक पटकावले.यावेळी सामाजिक कार्यकर्ते विनायक मुळे, सुरेश चौघुले दिलीप आग्रे,मयुरी शिगवण आदी मान्यवर उपस्थित होते.दहीहंडीच्या यशस्वीतेसाठी तळवली गाव हौशी युवा मंडळातील कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली.