अडूर येथील विठ्ठलाईदेवी ग्रामविकास मंडळाचा दहिकाला उत्साहात

अडूर | वार्ताहर : गुहागर तालुक्यातील अडूर येथील श्री.विठ्ठलाईदेवी ग्रामविकास मंडळ, अडूर (रजि.) या मंडळाच्या सात बलुतेदार समाज एकत्रित असलेल्या (तेली, कुंभार, कुणबी, न्हावी, सोनार, सुतार व गुरव) या मंडळाच्या गोविंद पथकाने अनेक पिढ्यांची परंपरा जोपासत ‘गोविंदा रे गोपाळा’ असे म्हणत टाळ- मृंदुगाच्या तालावर ठेका धरून उत्साहवर्धक वातावरणात दहीहंडी उत्सव साजरा केला.

सदर मंडळाचा पाच तास चाललेला हा गोपाळकाला श्री.विठ्ठलाईदेवी मंदिरातून सुरु करून मंडळातील एकूण ९० घरां- घरांमधून पारंपारिक गाणी म्हणत टाळ-