जपली छत्रपती शिवाजी महाराजांची अस्मिता !
मालवण | प्रतिनिधी :
किल्ले राजकोट येथे ठाकरे गटाने केलेल्या धक्काबुक्कीत राजकोट किल्ल्याच्या तटबंदी वरील दगड कोसळून नुकसान झाले. यावेळी लपून बसलेले आदित्य ठाकरे, वैभव नाईक पोलीस गराड्यात पळून गेले. मात्र भाजपा नेते निलेश राणे यांनी भाजपा कार्यकर्त्यांना थांबाण्याचे आवाहन केले. स्वतः पुढाकार घेत किल्ल्याच्या तटबंदी चे कोसळलेले दगड पुन्हा जागी बसवले.

निलेश राणे यांच्या या कृतीचे व महाराजांप्रती असलेल्या हृदयस्पर्शी भावनीकतेचे दर्शन उपस्थितानी अनुभवले.
एकीकडे राडा करणारे व दगड कोसळून पळून जाणारे कुठे व स्वतः दगड उचलून लावून घेणारे निलेश राणे कुठे अश्या भावना यावेळी उपस्थितानी व्यक्त केल्या.












