दापोली l प्रतिनिधी:-दापोली येथील कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. दापोली मतदारसंघातील दापोली मतदार संघाचे लोकप्रिय आ. योगेश कदम यांच्या कार्यशैलीने प्रभावित होऊन त्यांनी प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. यावेळी सर्वांचे शिवसेनेत स्वागत केले आणि पुढील सामाजिक व राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी उबाठा गटातून श्री. आप्पा भंडारी, श्री. सुभाष मस्के, श्री. शशांक वाटेकर, श्री. कुंदन पाटील, श्री. कुणाल पाटील, श्री. किरण भंडारी, श्री. संतोष जाधव, श्री. जीवन जाधव, श्री. यश मस्के, श्री. जयदीप पाटील आदींनी तर मनसेतून कोकंब आळी येथील मिनल माने, श्री. नितीन बाक्कर, विद्या बाक्कर आदींनी प्रवेश केला.
दरम्यान सर्वांशी संवाद साधला आणि यापुढे सोबतीने दापोली तालुक्याचा विकास साधण्यासाठी एकजुटीने आदरणीय मुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली काम करूया आणि सर्वांगीण विकास साधण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करून समाजहिताची भूमिका घेऊया असे आवाहन सर्वांना करून योग्य ते मार्गदर्शन केले.










