निवास, कँफे, रेस्टॉरंटसह बँन्क्वेट हॉलची देखील सुविधा
दापोली l प्रतिनिधी– पर्यटन दृष्टया दापोली दिवसेंदिवस विकसित होत चालली आहे. दापोलीच्या किनारपट्टीवर अनेक हॉटेल्स पर्यटकांच्या स्वागताला सज्ज आहेत. मात्र दापोली शहरामध्ये हॉटेल्ससह अन्य सुविधांची वाणवा जाणवत होती. हेच लक्षात घेऊन दापोलीमध्ये सैतवडेकर ग्रुपने गोल्डन हेरीटेज नावाने पर्यटकांचे आदरातिथ्य होईल अशा तारांकित सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.
दापोलीमध्ये सुवर्ण सेवेत 100 वर्षाहूनही अधिक काळ सैतवडेकर ग्रुप कार्यरत आहे. दापोली, खेड, चिपळुण येथे त्यांच्या शाखा आहेत. चोख सोन्यासाठी व विविध दागिन्यांसाठी ग्राहकांच्या विश्वासार्हतेला उतरलेला ग्रुप म्हणून सैतवडेकर ज्वेलर्स हे कोकणामध्ये प्रसिध्द आहेत.
याच विश्वासाच्या जोरावर दापोलीमध्ये वाढते पर्यटन व या क्षेत्रातील संधी लक्षात घेऊन सैतवडेकर ग्रुपने आपले नवे दालन गोल्डन हेरीटेज या नावाने सुरू केले आहे. दापोलीकरांच्या व पर्यटकांच्या सेवेत हे दालन दि. 07 ऑक्टोबर पासून रूजू होत आहे. या सेवेमध्ये हॉटेल गोल्डन हेरीटेज या नावाने तारांकित निवासी व्यवस्था, पर्यटकांसाठी उपलब्ध असणार आहे. पर्यटकांची व दापोलीकरांच्या जिभेचे चोचले पुरविण्यासाठी गोल्डस्मिथस कँफे या नावाने दक्षिणात्य व कॉन्टिनेंटल खाद्य पदार्थ उपलब्ध असणारे नवे दालन या ठिकाणी उपलब्ध आहे. त्याचप्रमाणे चिअर्स अँण्ड बिअर्स या नावाने बार व परमिट रूम उपलब्ध असून दापोलीकरांना आपल्या कुटुंबासमवेत खाद्यपदार्थांचा आनंद लुटता यावा यासाठी सिल्व्हर स्पुन फाईन डाईन या नावाने फॅमिली रेस्टॉरंट सेवेमध्ये उपलब्ध झालेले आहे.
शहराच्या मध्यवर्ता ठिकाणी विविध कार्यक्रम व समारंभ साजरे करण्यासाठी पर्ल बन्व्वेट हाँल हॉल देखील उपलब्ध करण्यात आला आहे. या सर्व सेवा एकाच छताखाली पर्यटक व दापोलीकरांसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या असून या सेवांचा लाभ दापोलीकर व पर्यटकांनी घ्यावा असे आवाहन सैतवडेकर परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.











