तिघांचीही पोलीस कोठडीत रवानगी, आणखी धागेदोरे हाती लागण्याची शक्यता
खेड(प्रतिनिधी) मुंबई-गोवा महामार्गावर भरणेनजीक स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने चार लाख रुपये किंमतीच्या गांजा वाहतूकप्रकरणी तिघांच्या मुसक्या आवळल्यानंतर मंडणगड कनेक्शन उघड झाले आहे
गांजा नेमका आणला कुठून? याचा येथील पोलिसांकडून कसून शोध सुरू आहे. गांजा वाहतूक प्रकरणी आणखी धागेदोरे हाती लागण्याची दाट शक्यता आहे.
उदयसिंह मदनसिंह चुंडावत (३७), विशाल विद्याधर कोकाटे (३४), सिद्धेश उदय गुजर (३२ तिघेही रा. मंडणगड) हे तिघेजण महिंद्रा कंपनीच्या कंपनीच्या कारमधून (एम.एच ०११ सी.यु. ८१८७) २२.०५९ किलो ग्रॅम वजनाच्या गांजाची वाहतूक करत होते. स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक जनार्दन परबकर यांच्या नेतृत्वाखालील मुसक्या आवळल्या
या तिघांनी गांजा नेमका आणला कुठून?, गांजा नेमके कुठे नेणार होते? याचा येथील पोलिसांकडून कसून शोध घेण्यात येत आहे. गांजा वाहतुकीचे मंडणगड कनेक्शन उघड झाल्यानंतर आणखी कोणाचा सहभाग आहे का? याचाही पोलिसांकडून शोध घेतला जात आहे.











