सावंतवाडी । प्रतिनिधी : न्हावेली गावच्या उपसरपंच पदासाठी नुकतीच अक्षय पार्सेकर यांची निवड करण्यात आली आहे. तसेच गावच्या तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी गजानन दळवी यांची सर्वानुमते नियुक्ती करण्यात आली. या दोघांचेही भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांनी अभिनंदन करीत भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
विशाल परब यांनी न्हावेली ग्रामपंचायतीला भेट देत गावच्या विविध अडचणींबाबत सदस्य आणि ग्रामस्थांशी चर्चा केली. रोजगार आणि आरोग्याच्या प्रश्नांवर गावच्या पाठीशी ठामपणे राहण्याची आणि गावाच्या सहयोगातून परिवर्तन घडवून आणण्याची हमी विशाल परब यांनी दिली. यावेळी अक्षय पार्सेकर यांनी गावच्या विकास कामांबाबत विशाल परब यांचे निवेदनाद्वारे लक्ष वेधले आहे.
गावच्या ज्या मागण्या आहेत त्या लवकरात लवकर स्वतः लक्ष देऊन मार्गी लावेन, असे आश्वासन यावेळी विशाल परब यांनी ग्रामस्थांना दिले. गावाला भेट देत आपुलकीने गावच्या प्रश्नांबद्दल चर्चा केली यासाठी ग्रामस्थांनी विशाल परब यांचे आभार व्यक्त केले आहेत.
यावेळी युवा समाजिक कार्यकर्ते समिर पार्सेकर, रुपेश नाईक, तुळशीदास पार्सेकर, बंड्या दळवी, राज धवन, गजानन दळवी संदीप सावंत आदी मान्यवर उपस्थित होते.












