गडहिंग्लज एक्साईज गडहिंग्लज विभागाची कारवाई.
प्रतिनिधी/ रोहन कांबळे
कोल्हापूर: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क कोल्हापूर अधिक्षक श्रीमती स्नेहल श्रीकर नरवणे व उपअधीक्षक युवराज शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य उत्पादन शुल्क गडहिंग्लज विभागाने आजरा-आंबोली रोडवर गवसे गावच्या हद्दीत पुलाजवळ सापळा रचून गोवा बनावटीची दारू वाहतूक करणारी मारुती सुझुकी अल्टो क्र.एम.एच.०६ बी.इ ०४३५ पकडण्यात आली. कारमध्ये गोवा बनावटी दारूचे विविध ब्रँडचे ४१ बॉक्स मिळून आले.५,५५,३६० किंमतीचा वाहनासह मुद्देमाल जप्त करून पुढील चौकशीसाठी चालकास ताब्यात घेण्यात आले.
आरोपी रविराज आंबानी सावंत याचेवर बेकायदेशीररित्या गोवा बनावटी दारूची वाहतूक केलेबाबत महाराष्ट्र दारूबंदी कायद्याअंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क गडहिंग्लज निरीक्षक पी.आर.खरात, दुय्यम निरीक्षक दिवाकर वायदंडे, एन.एस.केरकर, जवान संदीप जानकर, बी.ए.सावंत, एस.बी.चौगले यांनी केली. गुन्ह्याचा पुढील तपास गडहिंग्लज एक्साईज’चे दुय्यम निरीक्षक दिवाकर वायदंडे करत आहेत.











