ग्रामपंचायत अधिकारी युनियन अध्यक्षपदी आदित्य कदम

मसुरे | झुंजार पेडणेकर : महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत अधिकारी युनियन, देवगड तालुका शाखा अध्यक्षपदी आदित्य संतोष कदम तर सरचिटणीसपदी श्रीमती श्रद्धा चेतन वळंजू यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

देवगड पं. स. च्या छत्रपती संभाजी महाराज सभागृहात आयोजित सभेत नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली. यावेळी महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत अधिकारी युनियनचे जिल्हाध्यक्ष प्रशांत वर्दम,जिल्हा महिला उपाध्यक्ष श्रीमती रेश्मा गोवळकर जिल्हा संघटक उज्वल झरकर, कार्यकारिणी सदस्य वैभव धुमाळे, वैभव ठाकुर, मंगेश राणे, शशिकांत तांबे उपस्थित होते. यावेळी देवगड शाखेची नवीन कार्यकारिणी निवड करण्यात आली. उपाध्यक्षपदी उमरअली मुल्लाणी, महिला उपाध्यक्ष रेश्मा सीताराम गोवळकर, कोषाध्यक्ष मनीषा दिगंबर पाटील, सहसचिव रुमा राम फड, कायदेविषयक सल्लागार विजय सुरेश मलगुंडे, प्रचार प्रसिद्धी प्रमुख सुषमा जांबुवंत खरवडे, संघटक प्रीती चक्रधर ठोंबरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.