माखजनला भरलेल्या आठवडा बाजारात झाड कोसळले

 

सुदैवाने जीवित व वित्त हानी नाही

माखजन |वार्ताहर : संगमेश्वर तालुक्यातील माखजन येथे शनिवारी आठवडा बाजार भरतो.हा आठवडा बाजार माखजन बाजारपेठेतून सरंद ला जाणाऱ्या रस्त्यावर भरतो.नेहमी प्रमाणे शनिवारी बाजार भरल्यावर अचानक भले मोठे झाड जमीनदोस्त झाले.

 

 

या घटनेत सुदैवाने जीवित किंवा वित्त हानी झाली नाही.मांडलेल्या बाजारातील दोन दुकानांच्या मध्ये हे झाड पडल्याने दुकांदारांचे देखील नुकसान झाले नाही.झाड पडल्याने काही काळ वाहतूक खोळंबली होती.
सतत या भागात गडनदीचे पाणी भरत असल्याने येथील जमीन देखील उमलली आहे.त्यामुळे हे झाड उन्मळून पडले.अन्य मोठाले वृक्ष देखील धोकादायक स्थितीत आहेत.बाजारात अचानक झाड कोसळल्याने आलेल्या ग्राहकात भीतीचे वातावरण होते.