महेश उशीर, रमेश कचरे आणि चैतन्य कांबळे यांनी पटकावला यंदाचा प्रबोधनकार युवा वक्ता पुरस्कार

 

ओणी पंचक्रोशी शिक्षण मंडळ आयोजित राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा

राजापूर (वार्ताहर): तालुक्यातील ओणी पंचक्रोशी शिक्षण मंडळ आयोजित प्रबोधनकार ठाकरे राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत महेश जनार्दन उशीर, रमेश सुनिल कचरे व चैतन्य पुंडलिक कांबळे यांनी प्रबोधनकार युवा वक्ता पुरस्कार पटकाविला.

ओणी प्रशाळेच्या शहाजी भाऊराव खानविलकर सभागृहात ही स्पर्धा पार पडली. हे स्पर्धेचे १९ वे वर्ष असून राज्याच्या विविध भागातून अनेक स्पर्धक या स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते. महेश उशीर (अहमदनगर), रमेश कचरे (पुणे) व चैतन्य कांबळे (गारगोटी) यांनी स्पर्धेचे विजेतेपद पटकावत युवा वक्ता पुरस्कारावर नाव कोरले. तर सुरज गोपाळ गोरे (मुंबई), चैतन्य बावधाने (पुणे) व हर्ष जांभळे (वैभववाडी) यांनी उपविजेतेपद पटकाविले.

स्पर्धेच्या बक्षिस वितरण समारंभाला प्रसिध्द लेखक, सुपसिध्द वक्ते, पत्रकार संजय आवटे प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित होते. यावेळी बोलताना श्री.आवटे यांनी चिमुकल्या गावात सुंदर शाळा म्हणजे ओणी हायस्कूल, अशा शब्दात संस्थेचे कौतुक केले. तर वासुदेव जर असा असेल तर खुप मित्र तर भेटणारच.. अशा शब्दात संस्थाध्यक्ष वासुदेव तुळसणकर यांचे कौतुक केले. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी बदलणाऱ्या जगाचा अंदाज नवीन पिढीला देणे गरजेचे असल्याचे सांगत वक्तृत्वासाठी विचार महत्वाचे असल्याचे सांगितले.

संस्थाध्यक्ष वासुदेव तुळसणकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यकमाला मराठे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजाराम राठोड, प्रदीप संसारे, अॅड. गुरूदत्त खानविलकर, संजय सावंत, गणपत भारती, नामदेव तुळसणकर, गंगाधर तुळसणकर, विवेक सावंत, गणपत जानस्कर, विश्वनाथ वडवलकर, नारायण शेलार, प्रमोद लिमये, सुर्यकांत तुळसणकर, सुर्यकांत सुतार, महादेव धुरे, राजाराम जड्यार, विजयकुमार वागळे, अॅड.एकनाथ मोंडे, डॉ. शैलेश शिंदेदेसाई, अनंत नागम, दादा खातू, संतोष वडवलकर, नाथ गांधी, रामचंद्र जानस्कर आदी उपस्थित होते. कार्यकमाचे सुत्रसंचालन विनोद मिरगुले यांनी तर आभार मुख्याध्यापक तानाजी शिंदे यांनी मानले.