कृषिदूतांनी राबविले साठवणीतील किडींचे प्रात्यक्षिक

 

कुटरे, चिपळूण | सध्या पावसाळी वातावरणामुळे ओलावा आणि तापमान कमी झाल्याने साठवणीतील अनेक किडींची क्रियाशीलता वाढते. नवीन हंगामाची गडबड सुरू असली तरी मागील हंगामातील उत्पादनांची साठवण अधिक काळजीपूर्वक करण्याची आवश्यकता आहे. धान्यावर तांदळातील सोंड किडा, छोटे भुंगेरे, खापरा भुंगा, दातेरी भुंगा, कडधान्यातील भुंगा, पतंग, तांबडा भुंगा इत्यादी किडींचा प्रादुर्भाव वाढून नुकसान होऊ शकते.

 

 

धान्याचे किडीमुळे नुकसान किडीमुळे वजनात घट, प्रत खालावणे याबरोबरच कमी तापमान व आर्द्रतेतील वाढीमुळे धान्यावर बुरशींचा प्रादुर्भाव वाढतो. धान्याची उगवण क्षमता कमी होऊन, बियाणे म्हणून वापरता येत नाही. त्यामुळे या विविध किडींचे नियंत्रण करणे आवश्यक आहे अशी माहिती कृषिदूत अनिकेत मस्के व आदित्य शिरसाट यांनी दिली. याप्रसंगी त्यांनी ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत धान्यातील किडींची ओळख व त्यांच्या नियंत्रणाचे उपाय याबद्दल प्रात्यक्षिक दिले.
यावेळी कृषिविश्व कृषिदूत संघातील त्यांचे सहकारी ऋषिकेश क्षीरसागर, तुषार यादव, संग्राम पाटील, सुमित सावंत, सुयश शिंदे, यश मगर, शुभम हराळे, अतुल निळे, नितीश वाली, संदेश डोमाळे, ओंकार फाळके तसेच शेतकरी उपस्थित होते.