चिपळूण (वार्ताहर) : तालुक्यातील आदर्श केंद्रीय शाळा निर्व्हाळ येथे हिवाळी क्रीडास्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडल्या. निर्व्हाळ केंद्रातील सर्व शाळेतील सर्व मुलामुलींनी स्पर्धेत खेळाचा आनंद लुटला. केंद्रीय प्रमुख सुप्रिया कदम यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.
यावेळी सरपंच मधुकर सावंत, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अमित वाघे, माता-पालक, शिक्षक-पालक अध्यक्ष आणि सदस्य, सर्व शिक्षक, ग्रामस्थ पालक, विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सुदेश सावंत, दिपक घाणेकर, दशरथ कदम, शैलेश घाणेकर, उमेश सावंत, मारुती सावंत यांनी मेहनत घेतली. पालक, ग्रामस्थांचे सहकार्य लाभले. या स्पर्धेसाठी आदर्श शाळा निर्व्हाळचे पदवीधर शिक्षक अशोक धनावडे यांनी कै. सरस्वती वसंत रामचंद्र धनावडे यांच्या स्मरणार्थ सर्व बक्षिसे शिल्ड ट्रॉफी, मिडल्स इत्यादी स्वखर्चाने वस्तुरुपाने देऊन कार्यक्रमाला शोभा आणली. हा खर्च आई वडिलांच्या स्मरणार्थ एक आदर्श निर्माण केला. सर्व खेळाडूंचा उत्साह वाढवला. विद्यार्थ्याच्यातील क्रीडा कौशल्याला प्रेरणा देण्याचे काम श्री. धनावडे सरांनी केल्याबददल त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. तसेच या हिवाळी क्रीडा स्पर्धा यशस्वी होण्यासाठी निलेश सावंत यांनी मेहनत घेतली.












