10 हजार रोख नव्हते, पैसे ट्रान्सफर होईपर्यंत डोळ्यादेखत अधिकारी मित्र बुडाला

असलेल्या अधिकाऱ्याचा गंगा नदीत बुडून मृत्यू झाल्याची घटना घडलीय. रोख १० हजार रुपये नसल्यानं वेळेत मदत मिळू न शकल्याने उपसंचालक असणाऱ्या आदित्य वर्धन सिंह यांचा बुडून मृत्यू झाला.

 

 

उत्तर प्रदेशातील कानपूर इथं आरोग्य विभागात ते उपसंचालक होते. त्यांची पत्नी महाराष्ट्रात न्यायाधीश आहे तर चुलत भाऊ आयएएस म्हणून कार्यरत आहे. दरम्यान, पण बुडणाऱ्या आदित्य यांना वाचवण्यासाठी पाणबुड्यांना द्यायला रोख १० हजार रुपये नव्हते. ते पैसे ऑनलाइन ट्रान्सफर होईपर्यंत पाणबुड्यांना पाण्यात उतरायला नकार दिला आणि तेवढ्या वेळेत आदित्य वर्धन नदीत बुडाले.

 

याबाबत मिळालेली माहिती अशी की, कानपूरच्या नाना मऊ घाटावर आरोग्य उपसंचालक आदित्य वर्धन सिंह हे त्यांच्या मित्रांसोबत गंगास्नानाला गेले होते. आदित्य यांच्या पत्नी शैलजा मिश्रा या महाराष्ट्रात न्यायाधीश आहेत. तर चुलत भाऊ अनुपम सिंह आयएएस असून ते मुख्यमंत्री नितीश कुमार यांचे सचिव आहेत.

 

आदित्य वर्धन गंगा नदीत स्नान करत असताना फोटो काढत होते. तेव्हा नदीतल्या खड्ड्यात ते घसरून पडल्यानंतर बुडायला लागले. तेव्हा मित्रांनी पाणबुड्यांना बोलावलं. पण त्यांनी रोख १० हजार रुपये मागितले. पैसे ऑनलाइन पाठवतो म्हणताच पाणबुड्यांनी शेजारच्या एका दुकानात ऑनलाइन ट्रान्सफर करायला सांगितलं. पैसे ट्रान्सफर झाल्यानंतर पाणबुड्यांनी नदीत उड्या घेतल्या. पण तोपर्यंत आदित्य वर्धन सिंह हे पाण्यात बुडाले.

 

आदित्य वर्धन सिंह पाण्यात बुडाल्याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांच्यासोबत एसडीआरएफचं पथक आणि पाणबुड्यांनाही बोलावलं. आदित्य वर्धन सिंह यांचा गंगा नदीत शोध घेण्यात आला पण ते सापडले नाहीत. अजुनही त्यांचा शोध सुरू आहे.