डम्पिंग ग्राउंडसाठी पर्यायी जागेचा शोध घ्या

 

रत्न सिंधु योजनेचे सदस्य किरण सामंत यांचे सहकारी, कार्यकर्त्यांना सूचना

लांजा (प्रतिनिधी) कोत्रेवाडी येथील प्रस्तावित डम्पिंग ग्राउंड प्रकल्प हा पूर्णपणे बोगस असल्याची बाब ग्रामस्थांनी रत्न सिंधू सदस्य किरण सामंत यांच्या लक्षात आणून दिल्यानंतर त्यांनी डम्पिंग ग्राउंड प्रकल्पासाठी पर्यायी जागेचा शोध घ्या, अशा सूचना सहकारी, कार्यकर्त्यांना केल्या आहेत.
कोत्रेवाडी येथील डम्पिंग ग्राउंड प्रकरण सध्या चांगलेच तापले आहे.त्या पार्श्वभूमीवर रत्न सिंधू सदस्य योजनेचे सदस्य किरण सावंत यांनी नुकतीच नवलादेवी मंदिर, कोत्रेवाडी येथे ग्रामस्थांची भेट घेतली होती. यावेळी ग्रामस्थांनी कोत्रेवाडी येथील प्रस्तावित प्रकल्प हा लोकवस्तीजवळ आणि रस्ता नसलेला अयोग्य आणि बोगस असल्याची गंभीर बाब त्यांच्या लक्षात आणून दिली.त्यामुळे किरण सामंत यांनी या प्रकल्पासाठी अन्य पर्यायी जागा शोधा, अशा सूचना दिल्या. तसेच यासाठी माझे तुम्हाला सर्वतोपरी सहकार्य राहील, मी तुमच्या पाठीशी आहे ,असे देखील ठाम आश्वासन किरण सावंत यांनी ग्रामस्थांना दिले
प्रकल्प हा बोगस आणि अयोग्य असल्याने तो रद्द करण्यात यावा अशी आग्रही मागणी मागणी ग्रामस्थांनी केली. तसेच ही जागा योग्य नसतानाही प्रशासन व‌ सत्ताधारी याच जागेवर का अडून का बसले आहेत? कोणाच्या पाठिंब्यावर ते आम्हा ग्रामस्थांवर जबरदस्ती करत आहेत? असा प्रश्न ग्रामस्थांनी उपस्थित केल्यानंतर यामध्ये माझा कोणताही संबंध नाही किंवा कोत्रेवाडी येथेच हा प्रकल्प व्हावा अशी आपली भूमिका नाही
असे किरण सामंत यांनी यावेळी स्पष्ट केले.
‌.
नगरपंचायतीवर शिवसेना शिंदे गटाची सत्ता आहे ,मग हा प्रकल्प होतोच कसा ?अशी ग्रामस्थांनी विचारणा केली असता हा प्रकल्प कोत्रेवाडी येथे राबवण्याबाबत आपला कोणताही संबंध नाही, उलटपक्षी विद्यमान आमदार राजन साळवी यांचीच कोत्रेवाडी येथे डम्पिंग ग्राउंड प्रकल्प होण्यामध्ये भूमिका असल्याचा गौप्यस्फोट केला. तसेच माजी खासदार राऊत यांनी देखील ग्रामस्थांना विश्वासात घ्या, प्रकल्प करावा किंवा नाही याबाबत चर्चा करून निर्णय घ्यावा असे त्यांना सूचित केले होते .मात्र आमदार राजन साळवी यांनी कोणाची ऐकले नाही, असे देखील यावेळी किरण सामंत यांनी यावेळी सांगितले.